शुभमन गिललाही संघाचा बाहेर बसावं लागणार? गौतम गंभीरने नेमकं काय सांगितलं?
September 23, 2026 06:21 PM
शुभमन गिललाही संघाचा बाहेर बसावं लागणार? गौतम गंभीरने नेमकं काय सांगितलं? (Photo: BCCI Twitter)
श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्ध टी20 मालिका खेळली. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची तयारी सुरू आहे. असं असताना भारतीय संघाने न्यूझीलंड दौऱ्यासाठी डावपेच आखण्यास सुरूवात केली आहे. 22 ऑक्टोबरपासून भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात पाच टी20, पाच वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यासाठी गौतम गंभीरने एक खास प्लान आखला आहे. न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी काही महत्त्वाच्या खेळाडूंना वनडे मालिकेत आराम दिला जाण्याची शक्यता आहे. कारण वनडे मालिकेनंतर लगेचच तीन दिवसांनी कसोटी मालिका होणार आहे. त्यामुळे भारताच्या महत्त्वाच्या खेळाडूंना रेड बॉल सराव करता यावा यासाठी वनडे मालिकेतील शेवटच्या काही सामन्यात आराम दिला जाऊ शकतो. यात कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिललाही आराम दिला जाऊ शकतो.
गौतम गंभीर नेमकं काय म्हणाला?
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने जियोस्टारशी बोलताना न्यूझीलंड कसोटी मालिकेतील प्लानबाबत सांगितलं. गौतम गंभीर म्हणाला की, 'कसोटी सामन्यांच्या तयारीसाठी काही वेळा फलंदाजांना व्हाईट बॉल क्रिकेटपासून ब्रेक घ्यावा लागतो. जेणेकरून कसोटी क्रिकेटमध्ये खेळू शकतील. कारण टी20 क्रिकेटमधून वनडे क्रिकेटमध्ये खेळणं सोपं असतं.' न्यूझीलंड दौऱ्यासाठी अजून संघ जाहीर केलेला नाही. पण या दौऱ्यात वनडे संघातील बहुतांश खेळाडू कसोटी क्रिकेट खेळताना दिसतील. यात कर्णधार शुभमन गिल, विकेटकीपर फलंदाज केएल राहुल, ओपनर यशस्वी जयस्वाल, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि नितीश कुमार रेड्डी यासारख्या खेळाडूंचा समावेश असू शकतो. त्यामुळे या खेळाडूंना कसोटी मालिकेच्या तयारीसाठी शेवटच्या दोन वनडे सामन्यात आराम दिला जाऊ शकतो.
भारतीय संघ पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेची तयारी करत आहे. या स्पर्धेसाठी शुभमन गिलच्या नेतृत्वात संघाची बांधणी सुरू आहे. असं असताना ...