पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मोठे बदल जाहीर केले आहेत. 25 सप्टेंबर रोजी सकाळपासून विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत शहरातील 17 प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच 24 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजल्यापासून विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर नो-पार्किंग लागू करण्यात येणार आहे.
विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्था लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत भाजपा आमदार विक्रम पाचपुते यांनी विद्यार्थ्यांना राजकीय ...
या प्रमुख मार्गावर वाहतूक राहिल बंद
शहरातील छत्रपती शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, कुमठेकर रोड, गणेश रोड, केळकर रोड, टिळक रोड, शास्त्री रोड, जंगली महाराज रोड, कर्वे रोड, फर्ग्युसन रोड, भांडारकर रस्ता, पुणे-सातारा रोड, सोलापूर रोड, प्रभात रोड, बागाडे रोड आणि गुरु नानक रोड या 17 प्रमुख मार्गांवर वाहतूक बंद राहणार आहे.
मिरवणूकीच्या मार्गावर नो- पार्किंग
24 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजल्यापासून मुख्य विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत मिरवणुकीच्या मार्गावर नो-पार्किंग राहणार आहे. पोलिस, अग्निशामक दल, रुग्णवाहिका आणि एमएसईबीच्या वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे.
या भागातील वाहतुकीत बदल
तसेच 25 सप्टेंबर रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून 26 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पुणे शहरात जड वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. धायरी, केशवनगर, मुंढवा, ससाणेनगर आणि हडपसर भागातील वाहतुकीतही आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहेत.
गणेश विसर्जनासाठी शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी 26 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी वाहने केवळ निश्चित पार्किंगच्या ठिकाणी उभी करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






