शुभमन गिललाही संघाचा बाहेर बसावं लागणार? गौतम गंभीरने नेमकं काय सांगितलं?

श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्ध टी20 मालिका खेळली. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची तयारी सुरू आहे. असं असताना भारतीय संघाने न्यूझीलंड दौऱ्यासाठी डावपेच आखण्यास सुरूवात केली आहे. 22 ऑक्टोबरपासून भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात पाच टी20, पाच वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यासाठी गौतम गंभीरने एक खास प्लान आखला आहे. न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी काही महत्त्वाच्या खेळाडूंना वनडे मालिकेत आराम दिला जाण्याची शक्यता आहे. कारण वनडे मालिकेनंतर लगेचच तीन दिवसांनी कसोटी मालिका होणार आहे. त्यामुळे भारताच्या महत्त्वाच्या खेळाडूंना रेड बॉल सराव करता यावा यासाठी वनडे मालिकेतील शेवटच्या काही सामन्यात आराम दिला जाऊ शकतो. यात कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिललाही आराम दिला जाऊ शकतो.

गौतम गंभीर नेमकं काय म्हणाला?


भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने जियोस्टारशी बोलताना न्यूझीलंड कसोटी मालिकेतील प्लानबाबत सांगितलं. गौतम गंभीर म्हणाला की, 'कसोटी सामन्यांच्या तयारीसाठी काही वेळा फलंदाजांना व्हाईट बॉल क्रिकेटपासून ब्रेक घ्यावा लागतो. जेणेकरून कसोटी क्रिकेटमध्ये खेळू शकतील. कारण टी20 क्रिकेटमधून वनडे क्रिकेटमध्ये खेळणं सोपं असतं.' न्यूझीलंड दौऱ्यासाठी अजून संघ जाहीर केलेला नाही. पण या दौऱ्यात वनडे संघातील बहुतांश खेळाडू कसोटी क्रिकेट खेळताना दिसतील. यात कर्णधार शुभमन गिल, विकेटकीपर फलंदाज केएल राहुल, ओपनर यशस्वी जयस्वाल, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि नितीश कुमार रेड्डी यासारख्या खेळाडूंचा समावेश असू शकतो. त्यामुळे या खेळाडूंना कसोटी मालिकेच्या तयारीसाठी शेवटच्या दोन वनडे सामन्यात आराम दिला जाऊ शकतो.


कसोटी क्रिकेट महत्त्वाचं...


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्यासाठी भारतासाठी न्यूझीलंड दौरा महत्त्वाचा आहे. या दौऱ्यात दोन्ही कसोटी जिंकणं अनिवार्य आहे. दुसरीकडे, कसोटी क्रिकेटबाबत बोलताना गौतम गंभीरने आपल्या भावनाही व्यक्त केल्या. गौतम गंभीर म्हणाला की, 'जेव्हा तुम्ही एखाद्या नव्या खेळाडूला संघात सहभागी करता, तेव्हा त्याला जाणीव करून देता की कसोटी क्रिकेट किती महत्त्वाचं आहे. माझ्या मते, मजबूत कसोटी क्रिकेट खेळणारा देशच मजबूत क्रिकेट खेळणारा देश असतो. रेड बॉल क्रिकेट खेळणं आमची प्राथमिकता आहे.' दरम्यान, गौतम गंभीने सांगितलं की, येणाऱ्या काळात खूप कमी खेळाडू तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे खेळाडूंना रोटेड करत राहणं गरजेचं आहे. एकाच पद्धतीने कसोटी, वनडे किंवा टी20 खेळणं कठीण आहे.

                  
Comments
Add Comment

PM Modi Praises Jay Meena : जय मीनाचे सॉफ्ट टेनिसमधील ऐतिहासिक यश; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुकाचा वर्षाव

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताचा युवा खेळाडू जय

जसप्रीत बुमराहची 'जपानी उशी' सोशल मीडियावर चर्चेत! काय आहे खासियत

भारतीय पुरूष संघ एशियन गेम्स 2026 स्पर्धेसाठी जापान दौऱ्यावर आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाने जापान विरुद्ध

अजित आगरकर निवड समितीवरून गेले तर गिलच्या टीमचं काय होणार? वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेपूर्वी नवा पेच

भारतीय संघ पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेची तयारी करत आहे. या स्पर्धेसाठी शुभमन गिलच्या

जापानविरुद्ध श्रेयस अय्यरला मिळाला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; पण का?

भारत आणि जापान यांच्यात एकमेव टी20 सामना नुकताच पार पडला. या सामन्यात भारताने जापानला 2 धावांनी पराभवाची धूळ चारली.

भारताचा टी20 क्रिकेटमध्ये द्विशतकी विजय, आतापर्यंत 10 संघांविरुद्ध असा आहे रेकॉर्ड

भारताने जापानविरुद्धचा सामना जिंकला आणि आपलं विजयाचं द्विशतक साजरं केलं. भारताने टी20 क्रिकेटमध्ये 200वा विजय

Video: जापानविरुद्धच्या सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा, शेवटच्या षटकात वाइडवर राडा, झालं असं की...

भारत आणि जापान यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगला. या सामन्यात शेवटच्या चेंडूवर काय होईल? अशी स्थिती होती. मात्र