मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीचा मोठा डाव, विलियम्सकडे सोपवली हेड कोचची जबाबदारी

वुमन्स प्रीमियर 2027 स्पर्धेसाठी पाचही फ्रेंचायझी सज्ज झाल्या आहेत. त्यासाठी संघांची बांधणी सुरू असून प्रशिक्षक स्टाफ बदलाचे वारे वाहू लागले आहे. असं असताना वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेपूर्वी मुंबई इंडियन्सने माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ल्यूक विलियम्स यांच्याकडे हेड कोचपदाची जबाबदारी सोपवली आहे. ल्यूक विलियम्स हे लीसा कीथली यांची जागा घेणार आहेत. लीसा कीथली यांना क्रिकेट ऑस्ट्रेलियात महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई इंडियन्सची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ल्यूक विलियम्स हे प्रतिष्ठित कोच असून त्यांच्या कारकिर्दीत आरसीबीने वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं जेतेपद मिळवलं होतं. ल्यूक विलियम्सने 2024 मध्ये आरसीबीला पहिल्यांदा जेतेपद मिळवून दिलं होतं.


ल्यूक विलियम्स वुमन्स बिग बॅश लीग स्पर्धेत एडिलेड स्ट्रायकर्सचे कोच होते. त्यांनी स्ट्रायकर्सला 2022 आणि 2023 मध्ये चॅम्पियन केलं होतं. त्यांच्या कारकिर्दीत द हंड्रेड स्पर्धेत सदर्न ब्रेवने दोन अंतिम फेरी गाठली आणि 2023 मध्ये जेतेपद मिळवलं होतं. असं असताना त्यांनी आता मुंबई इंडियन्सची धुरा हाती घेतली आहे. मुंबई इंडियन्स संघाचं प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर ल्यूक विलियम्स यांनी आनंद व्यक्त केला आहे. संघासोबत काहीतरी नवीन करण्यासाठी आणि रोमहर्षक क्रिकेटसाठी तयार असल्याचं त्यांनी सांगितलं.






ल्यूक विलियम्स भले चांगले कोच असतील, पण खेळाडू म्हणून त्यांची कारकिर्द खूपच खराब आहे. ल्यूक अष्टपैलू खेळाडू होते आणि साउथ ऑस्ट्रेलियासाठी पाच सामने खेळले आहेत. ल्यूके पाच सामन्यात 11.40 च्या सरासरीने 114 धावा केल्या. यात त्यांना अर्धशतक किंवा शतक करता आलं नाही. इतकंच काय तर विकेटही मिळाली नाही. 28 जानेवारी 2005 मध्ये त्यांनी करिअर संपलं आणि त्यांनी कोचिंगचा मार्ग पकडला. आता मुंबई इंडियन्सला धडे देणार आहेत.

Comments
Add Comment

पाकिस्तान संघावर नामुष्की! पुन्हा एकदा कर्णधार बदलण्याची आली वेळ, नेमकं काय सुरू आहे?

पाकिस्तान क्रिकेट संघात रोज काही ना काही उलथापालथी होत असतात. पाकिस्तान नुकताच इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. या

शुभमन गिलचं नशिब चांगलं आहे, कारण...! प्रशिक्षक गौतम गंभीर असं का म्हणाला?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 27 सप्टेंबरपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या वनडे मालिकेसाठी टीम

Asian Games 2026 : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाची ऐतिहासिक कामगिरी, चीनविरुद्ध झुंजत पटकावले कांस्यपदक!

नागोया: जपानमधील आयची येथे सुरू असलेल्या 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने उल्लेखनीय

आयपीएल 2027 चा महासंग्राम! भारतात 'या' शहरात पार पडणार मिनी लिलाव प्रक्रिया; तारीख आणि वेन्यू फायनल!

आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सर्वच फ्रेंचायझींची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. प्रत्येक फ्रेंचायझी आपला संघ सक्षम

तिकीट विंडो उघडली अन् बंद झाली! एका मिनिटात भारत वेस्ट इंडिज सामन्याची सर्व तिकिटे विकली, झालं असं की..

वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आला असून तीन सामन्यांची वनडे आणि पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या

शुभमन गिललाही संघाचा बाहेर बसावं लागणार? गौतम गंभीरने नेमकं काय सांगितलं?

श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्ध टी20 मालिका खेळली. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे