पाकिस्तान संघावर नामुष्की! पुन्हा एकदा कर्णधार बदलण्याची आली वेळ, नेमकं काय सुरू आहे?

पाकिस्तान क्रिकेट संघात रोज काही ना काही उलथापालथी होत असतात. पाकिस्तान नुकताच इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात पराभवाची मालिका पाहून संघातील सात खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. शेवटच्या सामन्यात निम्म्याहून अधिक संघ नवा होता. पण तरीही पाकिस्तानला इंग्लंडकडून 0-3 ने मात खावी लागली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान संघावर नामुष्की ओढावली आहे. आता पाकिस्तानी संघात आणखी एक मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. आता पाकिस्तानचा टी20 कर्णधार बदलण्याची शक्यता आहे. एशियन गेम्समध्ये कर्णधारपद भूषवणारा साहिबजादा फरहान यांच्या खांद्यावर फुल टाइम टी20 कर्णधाराची धुरा पडू शकते. पाकिस्तानचे हेड कोच माइक हेसन यांनी स्पष्ट संकेत दिले की, सलमान अली आगाच्या जागी साहिबजादा फरहान याच्या खांद्यावर टी20 संघाची धुरा सोपवली जाऊ शकते.

एशियन गेम्स स्पर्धेत पाकिस्तान संघाची धुरा साहिबजादा फरहानकडे आहे. संघाचे प्रशिक्षक माइक हेसन यांनी सांगितलं की, 'साहिबजादा फरहानकडे एशियन गेम्समध्ये कर्णधारपदाचा अनुभव घेण्याची चांगली संधी आहे. पुढे जाऊन तो टी20 संघाचा कर्णधार होऊ शकतो. याबाबतचा निर्णय निवड समिती आणि पीसीबी चेअरमन घेतील.' सलमान अली आगाच्या नेतृत्वात पाकिस्तानी संघाची स्थिती खूपच वाईट आहे. त्याची कामगिरीही काही खास नाही. त्यामुळे त्याला कसोटी संघातून वगळण्यात आलं. आता त्याच्याकडील टी20 संघाचं कर्णधारपदही काढून घेतलं जाईल, असं दिसत आहे.



साहिबजादा फरहानकडे 46 टी20 सामन्यांचा अनुभव आहे. आता एशियन गेम्समध्ये कर्णधारपदाची जबाबदारीही सांभाळत आहेत. साहिबजादा फरहानने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 2 शतकं आणि 10 अर्धशतकं ठोकली आहेत. तसेच त्याच्या नावावर 1305 धावा आहेत. एशियन गेम्समध्ये त्याच्या नेतृत्वात पाकिस्तान संघाने चांगली कामगिरी केली तर नक्कीच त्याचा विचार होईल. एशियन गेम्स स्पर्धेत पाकिस्तानचा संघ ब गटात आहे. उपांत्यपूर्व फेरीचा सामना 28 सप्टेंबरला होणार आहे. तर उपांत्य फेरी गाठून विजय मिळवला तर अंतिम फेरीत भारताशी सामना होऊ शकतो.
Comments
Add Comment

शुभमन गिलचं नशिब चांगलं आहे, कारण...! प्रशिक्षक गौतम गंभीर असं का म्हणाला?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 27 सप्टेंबरपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या वनडे मालिकेसाठी टीम

Asian Games 2026 : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाची ऐतिहासिक कामगिरी, चीनविरुद्ध झुंजत पटकावले कांस्यपदक!

नागोया: जपानमधील आयची येथे सुरू असलेल्या 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने उल्लेखनीय

आयपीएल 2027 चा महासंग्राम! भारतात 'या' शहरात पार पडणार मिनी लिलाव प्रक्रिया; तारीख आणि वेन्यू फायनल!

आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सर्वच फ्रेंचायझींची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. प्रत्येक फ्रेंचायझी आपला संघ सक्षम

तिकीट विंडो उघडली अन् बंद झाली! एका मिनिटात भारत वेस्ट इंडिज सामन्याची सर्व तिकिटे विकली, झालं असं की..

वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आला असून तीन सामन्यांची वनडे आणि पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या

शुभमन गिललाही संघाचा बाहेर बसावं लागणार? गौतम गंभीरने नेमकं काय सांगितलं?

श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्ध टी20 मालिका खेळली. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे

PM Modi Praises Jay Meena : जय मीनाचे सॉफ्ट टेनिसमधील ऐतिहासिक यश; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुकाचा वर्षाव

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताचा युवा खेळाडू जय