वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आला असून तीन सामन्यांची वनडे आणि पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेची भारतीय क्रीडाप्रेमींना प्रचंड उत्सुकता आहे. कारण या मालिकेत पुन्हा एकदा रोहित शर्मा आणि विराट कोहलीला खेळताना पाहायला मिळणार आहे. वनडे मालिकेत या दोन्ही खेळाडूंची निवड झाली आहे. इतकंच काय तर गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्माला वगळण्याच्या बातम्याही थंड बस्त्यात गेल्या आहेत. वनडे मालिका संपल्यानंतर भारतीय संघ पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील एक सामना इंदुरच्या होळकर स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यासाठी विद्यार्थ्यांकरिता सवलतीच्या दरात तिकीट नोंदणी सुरू होताच केवळ 1-2 मिनिटात 1200 तिकीटं बूक झाली आहेत. आता विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करूनच त्यांना तिकीटं दिली जाणार आहेत.
सामन्यासाठी तिकिटांची ऑनलाइन विक्री कधी?
इंदुरच्या होळकर स्टेडियममध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी20 मालिकेतील तिसरा सामना खेळला जाणार आहे. हा सामना 11 ऑक्टोबरला संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. या सामन्यासाठी जोरदार सुरू आहे. या सामन्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील तिकिटांची ऑनलाइन विक्री 25 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता सुरू होईल. पण या सामन्याची क्रेझ पाहता सर्वसाधारण प्रवर्गातील सर्व तिकीटे अल्पावधीतचं विकली जाण्याची शक्यता आहे. होळकर स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी सर्वात कमी तिकीट दर 1000 रुपये ठेवण्यात आला आहे. इतर तिकीट दर अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत, परंतु मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन लवकरच ते जाहीर करेल अशी अपेक्षा आहे.
शुभमन गिललाही संघाचा बाहेर बसावं लागणार? गौतम गंभीरने नेमकं काय सांगितलं?
श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्ध टी20 मालिका खेळली. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची तयारी सुरू आहे. असं ...
भारतीय संघाचा या मैदानात टी20 रेकॉर्ड जबरदस्त आहे. भारताने या मैदानात आतापर्यंत 4 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात विजय आणि फक्त एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. दरम्यान, टी20 मालिकेत प्लेइंग 11 कशी असेल याबाबतही उत्सुकता आहे. कारण अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेत वैभव सूर्यवंशीला बेंचवर बसावं लागलं होतं. तर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी ओपनिंग केली होती. इतकंच काय तर जापानविरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यातही वैभव सूर्यवंशीला डावललं गेलं. त्यामुळे एशियन्स गेम्स आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेतील प्लेइंग 11 इलेव्हनबाबत उत्सुकता आहे.
भारत वेस्ट इंडिज टी20 मालिका शेड्युल
- भारत वेस्ट इंडिज, पहिला टी20 सामना, 6 ऑक्टोबर
- भारत वेस्ट इंडिज, दुसरा टी20 सामना, 9 ऑक्टोबर
- भारत वेस्ट इंडिज, तिसरा टी20 सामना, 11 ऑक्टोबर
- भारत वेस्ट इंडिज, चौथा टी20 सामना, 14 ऑक्टोबर
- भारत वेस्ट इंडिज, पाचवा टी20 सामना, 17 ऑक्टोबर