Navi Mumbai Accident: ट्रान्स हार्बर रेल्वे विस्कळीत, नवी मुंबईमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; वाचा अपडेट

नवी मुंबई: उरण- बेलापूर रेल्वे मार्गिकेवर मोठी दुर्घटना घडली आहे. त्यामुळे ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गिका विस्कळित झालेली आहे. गुरूवारी दुपारी बेलापूर- उरण रेल्वे मार्गिकेवर एक कार ब्रिजवरून खाली पडल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळित झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमध्ये कार ड्रायव्हर गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. नेमका ही घटना कशी काय घडली? याची चौकशी नवी मुंबई पोलिसांकडून आणि रेल्वे प्रशासनाकडून केली जात आहे. घटनेची सखोल चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.



नवी मुंबईतील बेलापूरमध्ये दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास बेलापूर- उरण रेल्वे मार्गिकेवर भीषण घटना घडली आहे. बेलापूरमधील पारसिक हिल टेकडीवरून एक कार थेट खाली आल्याची घटना घडली आहे. या रेल्वे मार्गिकेवरून कोणतीही उपनगरीय लोकल येत नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. रस्त्यावरून जाताना कार थेट रेल्वे रूळांवर कोसळल्यामुळे काही काळ परिसरामध्ये भितीचे वातावरण आहे. या घटनेनंतर बेलापूर- उरण मार्गिकेवरील उपनगरीय लोकल सेवा खंडित करण्यात आली आहे. अद्याप रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांकडून ड्रायव्हरसोबत कारमध्ये आणखीन कोण प्रवासी होते का? याबद्दल माहिती समोर आलेली नाही. ड्रायव्हरवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहे.



बेलापूरच्या सिडको कार्यालयाला लागून असलेल्या पारसिक हिल टेकडीवर एक तरूण कार घेऊन गेला होता. त्याच दरम्यान ही घटना घडल्याची पोलिसांकडून सांगण्यात आली आहे. अचानक कार टेकडीवरून खाली रूळावर कशी काय आली? याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. दरम्यान, कार अपघातानंतर बेलापूर- उरण मार्गावर धावणारी एक लोकल रेल्वे रस्त्यातच थांबवण्यात आली आहे. दरम्यान, रेल्वे अपघातातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रूळांवर पडलेली कार हटवण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. या अपघातामध्ये ओव्हरहेड वायरीचे काही नुकसान झाले आहे का? याची चौकशी प्रशासनाकडून केली जात आहे. त्यामुळे काही काळ रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली आहे.

Comments
Add Comment

Ganeshotsav 2026: गणेशभक्तांना दिलासा; विसर्जनाच्या दिवशी रात्रभर धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, रेल्वेचंही जाणून घ्या अपडेट

मुंबई: मुंबई मेट्रो 3 ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गणपती

दिशा सालियन प्रकरणातील पुरावे सीबीआयकडे सुपूर्द, वडील सतीश सालियन यांच्याकडून पेन ड्राइव्ह जमा; दोषींवर तातडीने कारवाईची मागणी

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूशी संबंधित पुरावे असलेला पेन

Ganesh Visarjan 2026: गणेश विसर्जनासाठी नवी मुंबई पोलिसांचा बंदोबस्त; 2000 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना

नवी मुंबई: गणपती विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये 1044

IIT Bombay Mid Sem Exam : आयआयटी मुंबईच्या मध्य-सत्र परीक्षा 10 आणि 11 ऑक्टोबरला; विद्यार्थी आंदोलनानंतर संस्थेचा मोठा निर्णय

मुंबई: आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये बीटेकच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या दुर्दैवी

MPCB new rules : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमती शुल्करचनेत पुन्हा बदल

सांडपाण्याच्या प्रमाणानुसार वार्षिक शुल्क; सूक्ष्म, लघुउद्योगांसह बांधकाम, आरोग्य आस्थापना आणि जनरेटरसाठी नवी

Goregaon Fire : गोरेगावमध्ये 8व्या मजल्यावरील घराला आग; परिसरात खळबळ

एसीच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज मुंबई : मुंबईतील गोरेगाव पश्चिम परिसरात गुरुवारी सकाळी