Thursday, September 24, 2026

शुभमन गिलचं नशिब चांगलं आहे, कारण...! प्रशिक्षक गौतम गंभीर असं का म्हणाला?

शुभमन गिलचं नशिब चांगलं आहे, कारण...! प्रशिक्षक गौतम गंभीर असं का म्हणाला?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 27 सप्टेंबरपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज आहे. असं असताना या मालिकेपूर्वी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याचं एक विधान चर्चेत आलं आहे. हे विधान सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल आहे. वनडे फॉर्मेटमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या शुभमन गिलवर त्याने स्तुतीसुमनं उधळली आहेत. गौतम गंभीर एक परिपक्व कर्णधार म्हणून घडत आहे, असं सांगत गंभीरने त्याची पाठ थोपाटली. इतकंच काय तर शुभमन गिलचं नशिब पण चांगलं आहे, असंही सांगायला विसरला नाही. कारण त्याच्यासोबत मैदानात आणि मैदानाबाहेर मार्गदर्शन करण्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे दिग्गज खेळाडू आहेत.

रोहित विराटची साथ म्हणजे आशीर्वादच

कर्णधार शुभमन गिलला दिग्गज खेळाडूंची साथ मिळत असल्याने गौतम गंभीर म्हणाला की, 'वनडे क्रिकेटमध्ये शुभमन गिल खूपच नशिबवान आहे. त्याच्याकडे रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे अनुभवी खेळाडू आहेत. जे मैदानात खेळ सुरू असताना आणि मैदानाबाहेर रणनिती आखण्यासाठी पूर्णपणे मदत करतात.' गौतम गंभीरने पुढे सांगितलं की, भारतीय संघात इतके प्रतिभावान खेळाडू आहेत की, प्लेइंग 11 बाहेर कोणाला बसवायचा हा प्रश्न कायम पडतो. जेव्हा खेळाडू निवडीचा कठीण निर्णय घ्यायचा असतो तेव्हा कर्णधार आणि प्रशिक्षकासमोर मोठा पेच असतो. पण आतापर्यंत शुभमन गिलने प्रत्येक स्तरावर स्वत:ला सिद्ध केलं आहे.

शुभमन गिलकडून फार अपेक्षा

शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत उतरणार आहे. मात्र अजून संघ बांधणीचा पेच आहे. त्यात निवड समिती अध्यक्षांचा कार्यकाळ वाढवणार की नाही? हा देखील प्रश्न आहे. असं असताना शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाला वनडे फॉर्मेटमध्ये काही आव्हानांचा सामना करावा लागला. टीम इंडियाला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. तर न्यूझीलंडने घरच्या मैदानावर भारताला पराभवाची धूळ चारली होती. असं असताना गौतम गंभीरने त्याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सांगितलं की, 'मला वाटतं की त्याने त्याच्याकडून सर्वकाही व्यवस्थित केलं आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याच्यासाठी थोड कठीण टप्पा राहिला. पण मला विश्वास आहे की, लवकरच सर्व स्थिती बदलेल. कारण गिलने आपल्या कर्णधारपदाच्या भूमिकेत कोणतीही उणीव सोडलेली नाही.'

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >