Thursday, September 24, 2026

Mira Bhayandar News: भटक्या श्वानांना खाद्य दिल्यास दंड; महापालिकेच्या निर्णयावर पशुसंवर्धन विभागाने मागवला रिपोर्ट

Mira Bhayandar News: भटक्या श्वानांना खाद्य दिल्यास दंड; महापालिकेच्या निर्णयावर पशुसंवर्धन विभागाने मागवला रिपोर्ट
मीरा- भायंदर: मीरा- भायंदर महानगर पालिका क्षेत्रामधील श्वानप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे. मीरा- भायंदर महापालिका क्षेत्रामध्ये श्वानांना ठरवून दिलेल्या ठिकाणी खायला न दिल्यास कारवाई केली जाणार आहे. भटक्या श्वानांना कुठेही जेवण देणाऱ्यांना 5000 रूपयांपर्यंतचा दंड आकारला जाणार आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निर्णयाची कायदेशीर वैधता तपासणी करण्याचे निर्देश जिल्हा पशुसंवर्धन विभागाने दिले आहेत.
मीरा भायंदर महानगरपालिकेने शहरामध्ये भटक्या श्वानांना जेवण देण्यासाठी विशिष्ट जागा निश्चित केल्या आहेत. निवडून दिलेल्या परिसराच्या भटक्या कुत्र्यांना जेवण दिल्यास महापालिकेकडून 5000 रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद केली आहे. उघड्यावर खाद्य दिल्यामुळे होणारा अस्वच्छ परिसर, दुर्गंधी, अन्नाची नासाडी होते, म्हणून महापालिकेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर, महापालिका क्षेत्रातील नागरिकांची वाढती तक्रार लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने हा दंड लागू केला आहे. पण या निर्णयाला प्राणीमित्रांकडून विरोध केला जात आहे.
या निर्णयाला विरोध करत रोशन पाठक नावाच्या प्राणी मित्राने जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी पाठवलेल्या पत्रात नमुद केल्याप्रमाणे, महापालिकेने ठरवून दिलेल्या ठिकाणांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी श्वानांना खाद्य दिल्यास 5000 रुपयांचा दंड आकारण्याच्या आदेशाची कायदेशीर वैधता तपासण्याचे देण्यात आले आहेत. त्या निर्णयाचे महापालिकेच्या विधी व न्याय विभागाकडून अधिकृत मत जाणून घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. शिवाय, प्राणी जन्म नियंत्रण नियम, 2023 आणि भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार या प्रकरणाचा विचार करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महापालिकेच्या जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मोकाट श्वानांना जेवण देण्यावर बंदी नाही. पण, श्वानांना जेवण देण्याच्या ठिकाणांमध्ये वाढ केली जाणार असल्याचे महानगरपालिकेने यापूर्वीच स्पष्ट केले होते. दंडाच्या कायदेशीर प्रक्रियेबाबत विधी विभागाशी सल्लामसलत केल्यानंतर पुढील पाऊल उचलले जाईल, असे पशुसंवर्धन विभागाने म्हटले आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >