Thursday, September 24, 2026

Nashik Ganesh Visarjan 2026: अनंत चतुर्दशीला वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग

Nashik Ganesh Visarjan 2026: अनंत चतुर्दशीला वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग

Nashik Ganesh Visarjan 2026 : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकांना सुरुवात होणार आहे. मुख्य विसर्जन मिरवणुकीसह शहरातील विविध भागांत निघणाऱ्या मिरवणुका लक्षात घेता पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत. वाहतूक पोलिस उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. मिरवणूक आणि विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित रस्ते सकाळी 8 वाजल्यापासून मिरवणूक किंवा विसर्जन पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग

मुख्य मिरवणूक वाकडी बारव - कादर मार्केटमार्गे, फुले मंडई, अब्दुल हमीद चौक, बादशाही कॉर्नरवरून गाडगे महाराज पुतळा, धुमाळ पॉईंट, सांगली बँक सिग्नल, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, रविवार कारंजामार्गे मालेगाव स्टँडवरून पंचवटी कारंजा, मालवीय चौकातून कपालेश्वर मंदिराजवळून भाजी बाजारमार्गे म्हसोबा पटांगण असा मिरवणुकीचा मार्ग असेल.

नाशिकरोड परिसरातही वाहतूक बदल

नाशिकरोडमधील विसर्जन मिरवणूक बिटको चौक – - छत्रपती शिवाजी महाराज पुतळा - देवी चौक - रेल्वे स्टेशन पोलिस चौकी - सुभाष रोड - सत्कार पॉइंट - देवळाली गाव गांधी पुतळा - खोडदे किराणा दुकान - वालदेवी नदी या मार्गाने जाणार आहे.

नाशिकरोड रेल्वे स्टेशनच्या दिशेने येणाऱ्या बसेस दत्त मंदिर सिग्नलपर्यंत ये-जा करतील. सिन्नरकडून येणारी वाहतूक उड्डाणपुलावरून वळवण्यात येणार आहे. विहितगावकडून बिटकोकडे जाणारी अवजड वाहने रिपोटे कॉर्नरमार्गे मालधक्क्याकडे वळवली जातील. सिन्नरकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे येणारी वाहतूक बंद राहणार असून, वाय जंक्शन येथे बॅरिकेडिंग करून वाहतूक वळवली जाईल. नांदूर नाक्याकडून येणारी वाहने छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून तपोवन आणि टाकळी मार्गे पुढे जातील.

खुटवडनगरमध्ये 'हे' रस्ते बंद

खुटवडनगर परिसरात त्रिमूर्ती चौक आणि दत्तमंदिर चौकाकडून आयटीआय पुलाकडे जाणाऱ्या मार्गांवर दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांसाठी त्रिमूर्ती चौक – मोगल नगर – सीटू भवन – आयटीआय पूल हा पर्यायी मार्ग उपलब्ध असेल.

आनंदवल्लीतील वाहतूक अशी राहणार

आनंदवल्ली नदीपात्राजवळील चांदशी गाव ते आनंदवल्ली नदीपात्र या मार्गावरील सर्व रस्ते वाहनांसाठी बंद राहतील. पर्यायी मार्ग म्हणून चांदशी गाव रस्त्यावरून नाशिक तट कालव्याजवळून उजव्या बाजूने कालवा मार्गे मखमलाबादच्या दिशेने वाहतूक वळवण्यात येणार आहे.

देवळाली कॅम्पमध्येही रस्ते बंद

विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने नाशिकरोड ते देवळाली कॅम्प मार्गावरील सिलेक्शन कॉर्नर, झेंडा चौक, शारदा हॉटेल, जामा मशीद रोड, जुने बस स्टँड, संसारी नाका, संसारी गाव ते दारणा नदी हा मार्ग सर्व वाहनांसाठी बंद राहणार आहे.

बाहेरून येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग

सकाळी दहा वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत रस्ते टप्प्याटप्प्याने बंद होतील ओझर, दिंडोरी, पेठमधून येणारी वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूलमार्गे द्वारकाकडून इतरत्र जातील सीबीएस - कॅनडा कॉर्नर रामवाडीमार्गे इतरत्र जुना गंगापूर नाका - चोपडा लॉन्स - सीबीएस - मोडक सिग्नल गडकरी चौक मुंबई नाका -भाभानगरमार्गे इतरत्र इतर वाहन चालक हे दिंडोरी नाका, पेठ नाका, मखमलाबाद नाका, बायजाबाई छावणी, रामवाडी, चोपडा लॉन्समार्गे इतरत्र जातील

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >