कोल्ड ड्रिंक्सच्या बाटलीचा आकार वेगळा असतो कारण...
कोल्ड ड्रिंक्समध्ये कार्बन डायऑक्साइड वायू भरलेला असतो. त्यामुळे बाटली उघडताच फेस बाहेर पडतो किंवा जोरात हवा बाहेर पडते. कोल्ड ड्रिंक्सची बाटली दाबून भरली जाते किंवा हलवली तर त्या बाटलीच्या आतील बाजूस वायूचा दाब प्रचंड वाढतो. इतकंच काय तर कोल्ड ड्रिंक्स कायम थंड करून विकली जातात. जेव्हा एखादा द्रव पदार्थ गरजेपेक्षा जास्त थंड होतो तेव्हा त्याच्या आकारमानात आणि घनतेत बदल होतो. जर कोल्ड ड्रिंक्सच्या बाटलीचा तळ सपाट असता तर ती त्या दाबाने फुगेल किंवा फुटेल. पण तळाशी असलेल्या पाच उंचवटी रचनेमुळे वायुचा दाब कमी होतो. तसेच हा दाब समान रितीने पसरतो. हे कोपरे स्प्रिंगप्रमाणे काम करतात. त्यामुळे ही बाटली फुटण्याची शक्यता कमी होते. तसेच आकार बिघडत नाही.
रस्त्यावर वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागतं. सिग्नल, हेल्मेट यासह अनेक वाहतुकीचे नियम आहेत. गाडी चालवताना या नियमांचं ...
प्लास्टिकची बचत आणि खर्चात कपात
कोल्ड ड्रिंक्सच्या बाटलीच्या या विशिष्ट रचनेमागे आर्थिक गणितही आहे. कारण कोल्ड ड्रिंक्सची बाटली तयार करण्यासाठी जाड आणि कडक प्लास्टिक लागतं. यावर उपाय म्हणून संशोधकांनी उपाय शोधला. बाटलीचा वरचा भाग पातळ प्लास्टिकचा असतो आणि खालचा भाग कडक, तसेच पंचकोनी रचनेत असतो. यामुळे बाटली तयार करण्यासाठी कमी प्लास्टिक लागतं आणि पैशांची बचत होते.