बजाज ऑटो आपल्या लोकप्रिय Pulsar NS रेंजचा विस्तार नव्या हाय-टेक तंत्रज्ञानासह करण्यासाठी सज्ज झाली आहे. अधिकृत लाँचिंगपूर्वीच बजाज Pulsar NS200 आणि Pulsar NS400Z चे हे नवीन अपडेटेड व्हेरिएंट्स थेट डीलरशिप्समध्ये दाखल झाले आहेत. कंपनीने अद्याप या बाईक्सच्या लाँचची तारीख किंवा किंमत अधिकृतपणे जाहीर केलेली नाही, मात्र शोरूम्समध्ये त्यांच्या एन्ट्रीमुळे लाँचिंग अगदी जवळ आल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
दोन्ही बाईक्समधील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे कंपनीने दिलेले नवीन 5-इंच TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. या नव्या हाय-टेक डिस्प्लेमध्ये खालील अत्याधुनिक सोयी मिळतील. हा डिस्प्ले ब्लूटूथ आणि वाय-फाय कनेक्टिव्हिटीसह येतो, जो बजाजच्या स्मार्टफोन ॲपला सहज जोडला जाऊ शकतो. स्क्रीनवर थेट गूगल मॅप्सची नेव्हिगेशन माहिती दिसेल. विशेष म्हणजे, अँड्रॉइड फोन वापरकर्ते त्यांच्या फोनची स्क्रीन बंद असतानाही यावर नेव्हिगेशन वापरू शकतील. हा नवीन डिस्प्ले सहज नियंत्रित करण्यासाठी दोन्ही बाईक्सवरील स्विचगिअर आणि बटणांच्या रचनेत सुधारणा करण्यात आली आहे.
रायडर्स थेट बाईकच्या स्क्रीनवरून संगीत नियंत्रित करू शकतील, कॉल अलर्ट पाहू शकतील आणि थर्ड-पार्टी ॲप्सकडून येणाऱ्या सूचना मिळवू शकतील. इतकंच काय तर रायडर्स त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स, विमा आणि आरसी यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे डिजिटल स्वरूपात या स्क्रीनवर साठवू शकतात.
घर बदलताना गॅस कनेक्शनची चिंता सोडा; 'या' सोप्या पद्धतीने नवीन शहरात ट्रान्सफर करा सिलिंडर!
आयुष्याच्या चढउतारात आपल्याला अनेकदा एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्याची वेळ येते. नोकरी, शिक्षण या निमित्ताने शहर बदलावं लागतं. एका शहरातून दुसऱ्या ...
Bajaj Pulsar NS200 : अद्ययावत NS200 मध्ये WP Apex USD फ्रंट फोर्क्स असण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे या बाईकचा सस्पेंशन सेटअप पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम आणि सुसाट होईल. बाईकच्या टायर ग्रिप आणि ब्रेकिंग सिस्टीममध्येही कंपनीने काही महत्त्वपूर्ण बदल केल्याचे वृत्त आहे, मात्र बजाजने अद्याप या बदलांना अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
Bajaj Pulsar NS400Z: या बाईकमध्ये सध्याचेच 349.13 cc चे सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन कायम ठेवलं जाण्याची शक्यता आहे. कारण हे हे दमदार इंजिन 40.6 PS ची मॅक्सिमम पॉवर (9000 rpm वर) आणि 33.2 Nm चा पीक टॉर्क (7500 rpm वर) जनरेट करते.