मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध तेलगू अभिनेता रवी प्रकाश आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. आगामी ‘दशमी’ या चित्रपटातून ते मराठीत पहिल्यांदाच झळकणार असून, त्यांची भूमिका एका डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याची आहे. (Ravi Prakash Marathi Debut)
रवी प्रकाश या चित्रपटात ‘एसीपी आसिफ मुजावर’ ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. तपासाचा सखोल अनुभव असलेला आणि बारकाईने प्रकरणांचा तपास करणारा अधिकारी अशी त्यांच्या भूमिकेची रचना करण्यात आली आहे. चित्रपटाचा पॉवरपॅक्ड टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यात रवी प्रकाश यांचा खाकी वर्दीतील दमदार अंदाज पाहायला मिळतो. (Ravi Prakash Marathi Debut)
मुंबई : कॉमेडियन सुनील पाल आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. ‘बिग बॉस 20’च्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने ट्रोलर्सना दिलेल्या ...
‘दशमी’ हा रहस्य, थरार आणि सामाजिक वास्तवावर आधारित चित्रपट आहे. योगेश पांडुरंग भोसले यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, विजय निकम, गौरी इंगवले, प्रसन्न केतकर, देवेंद्र गायकवाड, शाम माशाळकर आणि राज कुंदन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
मराठीत पदार्पणाबाबत रवी प्रकाश यांनी सांगितले की, पहिल्याच मराठी चित्रपटात डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याची भूमिका मिळणे त्यांच्यासाठी खास आहे. या भूमिकेसाठी त्यांनी बारकाईने तयारी केली असून, मराठी प्रेक्षकांना त्यांची वेगळी व्यक्तिरेखा पाहायला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Ravi Prakash Marathi Debut)
‘दशमी’ हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(Ravi Prakash Marathi Debut)





