वसई : गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी सुरुची बीचवर मित्रांसोबत फुटबॉल खेळण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय अंकित गुप्ताचा समुद्रात बुडून बेपत्ता झाल्यानंतर 12 दिवसांनी मृतदेह सापडला. गुजरात सीमेजवळील पालघर जिल्ह्यातील मोर्डी समुद्रकिनारी त्याचा मृतदेह आढळून आला. (Vasai News)
14 सप्टेंबर रोजी सकाळी अंकित घरातून फुटबॉल खेळण्यासाठी निघाला होता. मित्रांसोबत तो सुरुची बीचवर पोहोचला. खेळताना फुटबॉल समुद्राच्या पाण्यात गेल्यानंतर तो आणण्यासाठी अंकित समुद्रात उतरला. प्राथमिक माहितीनुसार, समुद्राच्या जोरदार प्रवाहामुळे त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात वाहून गेला. (Vasai News)
वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सध्या क्रिकेट जगतात चर्चेचा विषय आहे. भारतासाठी अंडर 19 संघात त्याची निवड झाली असून वनडे मालिका खेळाल. त्याने ...
अंकित बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच वसई पोलीस, अग्निशमन दल आणि भारतीय तटरक्षक दलाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. बोटींच्या सहाय्याने समुद्रात शोध घेण्यात आला, तर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हवाई शोधमोहीमही राबवण्यात आली. किनारपट्टीवरील विविध भागातही सलग 12 दिवस शोध सुरू होता. (Vasai News)
मात्र, अनेक दिवसांच्या शोधानंतरही अंकितचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर 25 सप्टेंबर रोजी गुजरात सीमेजवळील मोर्डी येथे समुद्रकिनारी त्याचा मृतदेह आढळून आला. (Vasai News)
अंकित नायगाव पूर्वेतील रश्मी परिसरात राहत होता आणि रश्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकत होता. गणपतीच्या आगमनाच्या दिवशी अंकित बेपत्ता झाला आणि विसर्जनाच्या दिवशी त्याचा मृतदेह सापडला, त्यामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या 12 दिवसांच्या शोध आणि प्रतीक्षेचा अखेर अत्यंत वेदनादायी अंत झाला. (Vasai News)