पृथ्वीपलीकडील जगाबाबत मानवी संस्कृतीत कायमच आकर्षण राहिलं आहे. या पृथ्वीबाहेरही जग आहे का? असं कायम मनात वाटत असतं. यासाठी गेल्या काही वर्षात पृथ्वीबाहेरील जगाचा शोध घेण्यासाठी संशोधन सुरू आहे. मात्र अजूनही ठोस असं हाती काही लागलेलं नाही. पण असं असलं तरी शास्त्रज्ञांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले आहेl. एक ना एक दिवस नक्कीच काही ना काही हाती लागेल हा विश्वास आहे. असं असताना अलीकडील एका रेडिओ सिग्नलमुळे शास्त्रज्ञांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. शास्त्रज्ञांनी पृथ्वीपासून सुमारे 63 प्रकाशवर्षे दूर असलेल्या सूर्यमालेबाहेरील एका रहस्यमय ग्रहावरून रेडिओ सिग्नल शोधून काढला आहे. त्या अज्ञात ग्रहावरून सतत रेडिओ लहरी उत्सर्जित होत असल्याचं दिसून आलं आहे.
कोणत्या ग्रहावरून आला रहस्यमय सिंग्नल?
हार्वर्ड आणि स्मिथसोनियन सेंटर फॉर ॲस्ट्रोफिजिक्स येथील शास्त्रज्ञांच्या एका आंतरराष्ट्रीय संघाने मीरकॅट रेडिओ टेलिस्कोपचा वापर करून सिग्नल रेकॉर्ड केला आहे. अंतराळातील ज्या जागेवरून हा सिग्नल येत आहे, त्या ठिकाणाला शास्त्रज्ञांनी
'बीटा पिक्टोरिस बी' असं नाव दिलं आहे. हा ग्रह सूर्यमालेच्या बाहेरचा असून हा ग्रह देखील एखाद्या ताऱ्याभोवची परिभ्रमण करत असल्याचा अंदाज आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हा ग्रह आकाराने खूपच मोठा आहे. आपल्या सूर्यमालेतील गुरू ग्रहापेक्षा जवळपास 11 पट अधिक मोठा असल्याचा अंदाज आहे.
इस्राईलमध्ये मतदार यादीतून मुस्लिमांना वगळण्याची तयारी, नेतन्याहू यांच्या पक्षाने टाकले फासे
इस्राईलमध्ये 38 वर्षांनंतर पहिल्यांदाच सरकार मुदतपूर्व विसर्जित न होता, आपला पूर्ण कार्यकाळ संपवून नियोजित वेळेनुसार निवडणुकीला सामोरे जात आहे. ...
एलियनकडून मिळाला सिग्नल!
एलियनबाबत कायमच गूढ रहस्य आहे. एलियन आहेत की माहिती नाही, पण चित्रपटातून त्याचं स्वरूप पाहता अनेकजण कल्पनाविलास करतात. त्यामुळे हा सिग्नल एखाद्या एलियनने तर पाठवला नाही ना, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. कारण या ग्रहावरून सतत रेडिओ लहरी बाहेर पडत आहेत. त्यामुळे संशोधनाचा विषय आहे. यापूर्वीही अवकाशात अनेक वळा रेडिओ सिग्नल आढळले आहे. पण हा सिग्नल कोणत्या ग्रहावरून येतो हे कधीच सिद्ध करता आलं नाही. मात्र पहिल्यांदाच शास्त्रज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हा शोध लावला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, एखाद्या ग्रहावर जीवसृष्टीच्या शक्यतेसाठी चुंबकीय क्षेत्र असणं आवश्यक आहे, कारण यामुळे ग्रहाच्या वातावरणाचे अवकाशातील धोकादायक किरणोत्सर्गापासून संरक्षण होते.