नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनात 14 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. गणेशमूर्तीच्या विसर्जनापूर्वी भव्य मिरवणूक काढण्यात आली. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात दिल्लीकर आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले. (Maharashtra Sadan Delhi)
विसर्जन कार्यक्रमाची सुरुवात जुन्या महाराष्ट्र सदनातून झाली. निवासी आयुक्त गुंतवणूक सुशील गायकवाड यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. त्यानंतर झांज पथक आणि ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली. जुन्या महाराष्ट्र सदनापासून नव्या महाराष्ट्र सदनापर्यंत काढण्यात आलेल्या या मिरवणुकीमुळे परिसर भक्तिमय आणि चैतन्यमय झाला. नव्या महाराष्ट्र सदनात पोहोचल्यानंतर विधिवत धार्मिक विधी पार पाडून गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. (Maharashtra Sadan Delhi)
मुंबई : मुंबईतील गिरगाव चौपाटीवर झालेल्या गणेश विसर्जन सोहळ्यात 23 देशांतील आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी उत्साहाने सहभाग घेतला. ढोल-ताशांचा गजर, भव्य ...
या 12 दिवसांच्या उत्सवात दररोज सकाळी 9 वाजता आणि सायंकाळी 6.15 वाजता महाआरती करण्यात आली. यासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भरत जाधव यांचे ‘पुन्हा सही रे सही’ नाटक, नितीन सरकटे हंसराज यांची लाईव्ह कॉन्सर्ट, वैभव जोशी व संदीप खरे यांचा ‘मराठी चित्रपट गीते’ कार्यक्रम, तसेच वैशाली सामंत, ऋषिकेश रानडे आणि शरयू दाते यांच्या गायन कार्यक्रमांना रसिकांचा प्रतिसाद मिळाला.
भरतनाट्यम, लावणी, ‘खेळ पैठणीचा’ आणि ‘बॉली बीट्स’ यांसारख्या कार्यक्रमांनी उत्सवाची रंगत वाढवली. 19 सप्टेंबरला श्री सत्यनारायण पूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. (Maharashtra Sadan Delhi)
‘चव महाराष्ट्राची!’ या उपक्रमातून पुरणपोळी आणि उकडीचे मोदक यांचे लाईव्ह स्टॉल, तर ‘कौशल्याला सलाम!’ अंतर्गत दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या कलावस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. तसेच पैठणी, इंदुरी, माहेश्वरी, इरकल साड्या आणि हस्तमाग वस्तूंच्या प्रदर्शनातून दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या वस्त्रपरंपरेची ओळख झाली. (Maharashtra Sadan Delhi)
मुंबई : आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवाच्या काळात रेल्वे प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने तब्बल 418 विशेष गाड्या चालवण्याची ...
गणेशोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांनी नागरिक, कलाकार, स्वयंसेवक, संस्था आणि आयोजन समितीचे आभार मानले. दिल्लीकर आणि महाराष्ट्रप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यंदाचा गणेशोत्सव भक्ती, कला आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम ठरला. (Maharashtra Sadan Delhi)





