"मी मराठवाड्याची लेक, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही!" दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची आश्वसक हाक



नांदेड: "मी मराठवाड्याची लेक आहे, या मातीतल्या शेतकऱ्यांच्या अडचणी मला चांगल्याच ठाऊक आहेत," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी नांदेड दौऱ्यात शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजाला कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली आहे. शेतशिवारात प्रत्यक्ष पाहणी आणि बळीराज्याशी संवाद नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील बारूळ फाटा, सोनखेड येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थेट शेतशिवारात जात शेतकरी संदीप रामराव जायभाय यांच्या शेताला भेट दिली. यादरम्यान त्यांनी 9 जुलै रोजी लागवड केलेल्या सोयाबीन पिकाची सद्यस्थिती, वाढ, संभाव्य नुकसान आणि पावसाअभावी पिकावर झालेले विपरीत परिणाम यांची प्रत्यक्ष पाहणी केली.(Sunetra Pawar Marathwada)


?si=xbw_xZdNZCVRUNEw


या पाहणीदरम्यान त्यांनी केवळ पिकांचाच आढावा घेतला नाही, तर बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. शेतकरी कुटुंबांच्या दैनंदिन गरजा, जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या अडचणी त्यांनी अत्यंत आत्मीयतेने समजून घेतल्या.


?feature=share

शासनाकडून मदतीची आणि उपाययोजनांची ग्वाही यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले की, केवळ शेतीचे नुकसान भरून काढणे नव्हे, तर शेतकऱ्यांच्या लेकरा-बाळांचे शिक्षण, जनावरांचा चारा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह हे प्रश्नही शासनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रशासनाने तात्काळ परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. संकटाच्या या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या सर्व मदत व उपाययोजनांसाठी शासनस्तरावर तातडीने पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.(Sunetra Pawar Marathwada)




Comments
Add Comment

Nitesh Rane : शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी मंत्री नितेश राणे छत्रपती संभाजीनगर-जालना दौऱ्यावर

Mumbai : राज्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, नुकसानग्रस्त मच्छीमार बांधव आणि

महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना नेमके काय मिळणार ?

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारची घोषणा

पीक कर्जाच्या पुनर्गठनासह विविध सवलती; ५ ऑक्टोबरपासून पंचनामे मुंबई : पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या

Vasai News : मित्रांसोबत फुटबॉल खेळायला गेला, पण घरी परतलाच नाही; अखेर 12 दिवसांनी अंकितचा मृतदेह सापडला

वसई : गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी सुरुची बीचवर मित्रांसोबत फुटबॉल खेळण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय अंकित

Nandurbar Ganesh Visarjan 2026 : नंदुरबारमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, ‘हरिहर भेटी’कडे भाविकांचे लक्ष

Nandurbar Ganesh Visarjan 2026 : नंदुरबार शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सकाळपासून उत्साहात सुरुवात झाली आहे. प्रथम मानाचा गणपती

Cm Devendra Fadanvis News: माथाडी कायदा कायम राहणार, वडाळ्यात कामगारांना मिळणार ३ हजार घरे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

ठाणे: माथाडी कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कायदेशीर संरक्षण देणारा ऐतिहासिक माथाडी कायदा कोणत्याही