Mumbai : राज्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, नुकसानग्रस्त मच्छीमार बांधव आणि तलावांच्या प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे हे सोमवार, दि. 28 सप्टेंबर 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर येत आहेत.
पावसाच्या अभावामुळे आणि तीव्र दुष्काळामुळे जलसाठे व मत्स्यव्यवसायावर झालेला विपरीत परिणाम समजून घेण्यासाठी मंत्री महोदय स्वतः मैदानात उतरणार असून, या संदर्भातील दौरा निश्चित करण्यात आला आहे.(Drought Like Situation)
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा सात दिवसांचा शस्त्रसंधीचा आणि महत्त्वाची ऊर्जा वाहिनी पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव थेट फेटाळून लावला आहे. ...
मंत्री नितेश राणे यांचा मिनिट-टू-मिनिट दौरा कार्यक्रम:
पहाटे ०४:४५ वा.: मुंबईतील 'अधीश' निवासस्थानावरून सांताक्रूझमधील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाकडे मोटारीने प्रयाण.
सकाळी ०५:२५ वा.: इंडिगो विमानाने (क्र. 6E-5081) छत्रपती संभाजीनगरकडे उड्डाण.
सकाळी ०६:४० वा.: चिकलठाणा विमानतळ, छत्रपती संभाजीनगर येथे आगमन आणि शासकीय विश्रामगृहाकडे प्रस्थान.
सकाळी ०९:०० वा.: विश्रामगृहावरून कन्नड तालुक्यातील शिवणटाकळी तलावाकडे मोटारीने प्रवास.
सकाळी १०:०० ते १०:३० वा.: शिवणटाकळी तलाव (ता. कन्नड) येथे आगमन; प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक मच्छिमारांशी संवाद व चर्चा.
सकाळी १०:३० वा.: समृद्धी महामार्गावरून जालना जिल्ह्याकडे प्रस्थान.(Drought Like Situation)
दुपारी १२:३० ते ०१:०० वा.: राजेवाडी तलाव (ता. बदनापूर, जि. जालना) येथे पोहोचून पाहणी.
दुपारी ०१:१५ ते ०१:४५ वा.: सोमाठणा तलाव (ता. बदनापूर) येथे पाहणी करून मच्छिमार बांधवांच्या अडीअडचणी जाणून घेणार.
दुपारी ०३:३० ते ०५:०० वा.: जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासकीय अधिकाऱ्यांसमवेत उच्चस्तरीय आढावा बैठक. या बैठकीत मत्स्यव्यवसायाची सद्यस्थिती आणि नुकसानग्रस्तांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार आहे.
सायंकाधी ०५:१० वा.: शासकीय विश्रामगृह, छत्रपती संभाजीनगर येथे आगमन व मुक्काम.
मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ (परतीचा प्रवास): सकाळी ७:१५ वाजता चिकलठाणा विमानतळावरून इंडिगो विमानाने (क्र. 6E-6126) मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू करून सकाळी ८:१५ वाजता मुंबईत आगमन होईल.
या दौऱ्यामुळे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील मच्छिमारांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचून त्यांना तातडीने दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या बैठकीमध्ये मत्स्यव्यवसायाशी संबंधित सद्यस्थिती, जलसाठ्यांची उपलब्धता तसेच नुकसानग्रस्त मच्छीमारांच्या विविध प्रश्नांबाबत सखोल आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले जाण्याची शक्यता आहे. प्रशासकीय यंत्रणेने या दौरा व बैठकीची जय्यत तयारी केली असून, हवालदिल झालेल्या मच्छीमारांना यातून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.(Drought Like Situation)