Nashik : दिवाळी-छठसाठी रेल्वेचा मोठा निर्णय ! नाशिक, मनमाड, इगतपुरीहून उत्तर भारतासाठी विशेष गाड्या

Nashik Railway : दिवाळी आणि छठ उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मुंबईहून विविध शहरांसाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांना नाशिक रोड, मनमाड आणि इगतपुरी येथे थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांना सणासुदीच्या काळात उत्तर भारत तसेच विदर्भाकडे जाण्यासाठी अतिरिक्त रेल्वेसेवेचा लाभ मिळणार आहे.

मुंबई-गोरखपूरदरम्यान दररोज विशेष गाड्या


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मुंबई ते गोरखपूरदरम्यान दररोज विशेष गाड्या धावणार आहेत. ०१०७९ क्रमांकाची गाडी १६ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबरदरम्यान दररोज रात्री १०.३० वाजता मुंबईहून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता गोरखपूरला पोहोचेल. परतीची ०१०८० क्रमांकाची गाडी १८ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबरदरम्यान दररोज दुपारी २.३० वाजता गोरखपूरहून सुटणार आहे. या गाड्यांना नाशिक रोड, मनमाड, जळगाव आणि भुसावळ यांसह विविध स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

मुंबई-नागपूर विशेष गाडीलाही थांबा


मुंबई-नागपूर मार्गावर ०२१३९ आणि ०२१४० या साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. मुंबईहून नागपूरकडे जाणारी गाडी दर शनिवारी, तर नागपूरहून मुंबईकडे येणारी गाडी दर रविवारी धावणार आहे. या गाड्यांना नाशिक रोड आणि मनमाड येथे थांबे आहेत. याशिवाय जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवरही थांबे देण्यात आले आहेत.


महू आणि बनारससाठीही विशेष रेल्वेसेवा


लोकमान्य टिळक टर्मिनस-महू मार्गावर ०११२३ आणि ०११२४ या द्विसाप्ताहिक विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांना इगतपुरी आणि नाशिक रोड येथे थांबा देण्यात आला आहे. पुढे या गाड्या जळगाव आणि भुसावळमार्गे मार्गक्रमण करतील. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस मार्गावर ०१०५१ आणि ०१०५२ या द्विसाप्ताहिक विशेष गाड्या धावणार आहेत. या गाड्यांनाही इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव आणि भुसावळ येथे थांबे देण्यात आले आहेत.

नाशिककरांना मुंबई गाठण्याची गरज नाही


दिवाळी आणि छठच्या काळात उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांना या विशेष गाड्यांमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. नाशिक रोड, मनमाड आणि इगतपुरी येथूनच विशेष गाड्यांमध्ये प्रवास करता येणार असल्याने मुंबईला जाऊन रेल्वे पकडण्याची गरज भासणार नाही. सर्व विशेष गाड्यांमध्ये वातानुकूलित तृतीय श्रेणी, शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे उपलब्ध असतील.

कधीपासून करता येणार आरक्षण ?


पहिल्या गटातील विशेष गाड्यांचे आरक्षण २७ सप्टेंबर २०२६ पासून, तर दुसऱ्या गटातील गाड्यांचे आरक्षण २८ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे. प्रवाशांना संगणकीकृत आरक्षण केंद्रांसह IRCTCच्या संकेतस्थळावरून तिकीट आरक्षित करता येईल. तसेच RailOne ॲप वापरूनही तिकीट बुक करता येणार आहे. अनारक्षित डब्यांसाठी UTS प्रणालीद्वारे तिकीट उपलब्ध होईल. दिवाळी आणि छठच्या गर्दीच्या काळात नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांसाठी या विशेष रेल्वेगाड्या अतिरिक्त आणि सोयीची प्रवासाची सुविधा ठरणार आहेत.
Comments
Add Comment

Family Kirana Store TVF : टीव्हीएफच्या ‘फॅमिली किराणा स्टोअर’चा नवा विक्रम; अवघ्या १० महिन्यांत यूट्यूबवर तीन सीझन प्रदर्शित

गज्जू भैयांच्या (Gajju Bhaiya) किराणा दुकानाचे दरवाजे पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी खुले होण्यासाठी सज्ज झाले आहेत! द

एक दिवसापूर्वीच मोठी कारवाई! जाकिरच्या संघटनेला केंद्र सरकारचा सलग तिसरा दणका; पुढील 5 वर्षांसाठी 'हा' कठोर निर्णय!

नवी दिल्ली : वादग्रस्त इस्लामिक उपदेशक डॉ. जाकिर नाईक याने स्थापन केलेल्या 'इस्लामिक रिसर्च फाउंडेशन' (आयआरएफ) या

Cyclone Alert : राज्यासह देशात पुन्हा चक्रीवादळाचे संकट! अनेक राज्यांना अलर्ट

Cyclone Alert : पश्चिम बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.अलीकडेच गुलाबी थंडीला राज्यात

Assam Accident : आसाममध्ये भीषण अपघात ! ट्रॅव्हलर आणि कंटेनरची जोरदार धडक, 10 जणांचा मृत्यू

आसाम : आसाममधील काझीरंगा परिसरात भीषण रस्ते अपघाताची घटना घडली आहे. रोंगाजान भागात प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हलर

भारताच्या 244 धावांनी पराभवानंतर गौतम गंभीर संतापला; कोहली, रोहित आणि अय्यरच्या फलंदाजीवर टीका

नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा अवघ्या 89 धावांत डाव आटोपला आणि तब्बल 244

Nashik : नाशिकमध्ये आरपीएफची मोठी कारवाई ! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये संशयित तरुणाला पकडले, बॅगेतील रोकड पाहून आरपीएफही चक्रावले

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अशातच नाशिक