Nashik : नाशिकमध्ये दिंडोरी निवडणूक प्रशासनाचा संवेदनशील निर्णय; गर्भवती महिलेच्या घरीच पूर्ण केली SIR सुनावणीची प्रक्रिया

Nashik : शासकीय कामासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागतात, अशी सर्वसाधारण प्रतिमा आहे. मात्र, नाशिकमध्ये प्रशासनाने याला छेद देणारे संवेदनशील पाऊल उचलले आहे. निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरीक्षण (SIR) अभियानांतर्गत दाव्यांवरील सुनावणीसाठी एका गर्भवती महिलेला दिंडोरी नगरपंचायत कार्यालयात उपस्थित राहण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, तिची वैद्यकीय अडचण ओळखून प्रशासकीय पथकाने स्वतः तिच्या नाशिक येथील घरी पोहोचून सुनावणीची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.



नेमकं प्रकरण काय ?


निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरीक्षण (SIR) अभियानांतर्गत स्वामिनी सुधीर घोरपडे यांना दिंडोरी नगरपंचायत कार्यालयातील सुनावणी केंद्रावर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, त्या गर्भवती असून नाशिक येथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू. त्यामुळे नाशिक ते दिंडोरी प्रवास करणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक होते. ही बाब लक्षात आल्यानंतर दिंडोरी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी संदीप चौधरी यांनी पुढाकार घेतला. त्यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद आणि उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर आवश्यक परवानगी घेण्यात आली.



कुटुंबीय भावुक, निवडणूक अधिकाऱ्यांचे मानले आभार


परवानगी मिळाल्यानंतर दिंडोरीहून प्रशासकीय पथक थेट नाशिकला रवाना झाले. पथकाने स्वामिनी घोरपडे यांच्या घरी पोहोचून निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार सुनावणीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली. या विशेष पथकामध्ये दिंडोरीचे मुख्याधिकारी संदीप चौधरी, पर्यवेक्षक व प्रशासकीय अधिकारी (BLO) विजय देवरे, जयराम राठोड आणि संगणक प्रचालक श्वेताली आहेर यांचा समावेश होता. प्रशासनाने दाखवलेल्या या संवेदनशीलतेबद्दल घोरपडे कुटुंबीयांनी निवडणूक अधिकाऱ्यांचे आभार मानले. नागरिकांची गैरसोय टाळत शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.

Comments
Add Comment

Dabur India : डाबरच्या पोर्टफोलिओत सेसा केअरचा समावेश; NCLTकडून विलीनीकरणाला मंजुरी

मुंबई : प्रीमियम आयुर्वेदिक हेअर केअर ब्रँड सेसा केअर प्रायव्हेट लिमिटेडच्या डाबर इंडियामधील विलीनीकरणाला

Mumbai Port : मुंबई बंदरावर ‘बार्ज रोल-ऑफ’चा यशस्वी प्रयोग; 1,452 मेट्रिक टन अवजड मालाची सुरक्षित हाताळणी

मुंबई : मुंबई बंदर प्राधिकरणाने अत्यंत अवजड आणि मोठ्या आकाराच्या औद्योगिक उपकरणांची यशस्वी हाताळणी करत नवी

Nashik Crime: गुंडा विरोधी पथकाने नाशिकमध्ये शस्त्रविक्रीचा डाव उधळला; तिघे ताब्यात, 2.15 लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक: नाशिक शहरामध्ये दिवसाढवळ्या गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे विक्रीसाठी आणणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक

Nashik : महाराष्ट्रातील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, नाशिक विभागातील 'या' 49 तालुक्यांचा समावेश

Nashik : पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अखेर २६५

Central Railway : सणासुदीच्या गर्दीसाठी मध्य रेल्वे सज्ज; 418 विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवाच्या काळात रेल्वे प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य

Central Railway : मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक; सेवांमध्ये बदल

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे