Awarapan 2 OTT Release : 'इम्रान हाश्मी'चा सुपरहिट सिनेमा आता घरबसल्या पाहता येणार! ‘आवारापन 2’ची OTT रिलीज डेट जाहीर

मुंबई : 'इम्रान हाश्मी'च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. थिएटरमध्ये दमदार कमाई करणारा ‘आवारापन 2’ आता OTTवर दाखल झाला आहे. इम्रान हाश्मी आणि दिशा पटानी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा रोमँटिक ॲक्शन ड्रामा सध्या Amazon Prime Video वर उपलब्ध आहे. (Awarapan 2 OTT Release)


14 ऑगस्ट 2026 रोजी रिलीज झालेल्या ‘आवारापन 2’ची बॉक्स ऑफिसवर चांगलीच चर्चा झाली होती. सनी देओलच्या ‘बंटवारा 1947’सोबत या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर थेट टक्कर झाली. कथानक आणि गाण्यांमुळे ‘आवारापन 2’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. (Awarapan 2 OTT Release)


सुमारे ₹90 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने भारतात जवळपास ₹152 कोटींची कमाई केली, तर जगभरातील कलेक्शन ₹220 कोटींच्या पुढे गेल्याचा दावा करण्यात आला आहे.(Awarapan 2 OTT Release)




दरम्यान, थिएटरमध्ये हा सिनेमा पाहता न आलेल्या प्रेक्षकांसाठी आता OTTचा पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र, सध्या ‘आवारापन 2’ Amazon Prime Video वर थेट मोफत स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध नाही. हा चित्रपट सध्या ₹349 च्या रेंटल ऑप्शनवर पाहता येत आहे.


महत्त्वाचं म्हणजे, ज्या प्रेक्षकांकडे Amazon Prime Videoचे सबस्क्रिप्शन आहे, त्यांनाही सध्या रेंटलसाठी ₹349 वेगळे द्यावे लागणार आहेत. मात्र, 9 ऑक्टोबरपासून ‘आवारापन 2’ Prime Videoच्या सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. (Awarapan 2 OTT Release)



म्हणजेच, आणखी काही दिवसांची प्रतीक्षा केल्यानंतर प्रेक्षकांना हा सिनेमा घरबसल्या कोणत्याही अतिरिक्त रेंटल शुल्काशिवाय पाहता येणार आहे. त्यामुळे इम्रान हाश्मीच्या चाहत्यांसाठी 9 ऑक्टोबरची तारीख खास ठरणार आहे. (Awarapan 2 OTT Release)


Comments
Add Comment

Ramayana Movie Update : 'रामायण' चित्रपटातील 'रॉकिंग स्टार' यशचा रावणाचा राजेशाही लूक प्रदर्शित; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला!

मुंबई : चित्रपटसृष्टीतील अत्यंत महत्वाकांक्षी आणि बहुप्रतिक्षित असा दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा आगामी

Prahaar Trailer: उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकचा ट्रेलर मुंबईच्या ऐतिहासिक ठिकाणी रिलीज होणार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला...

मुंबई: गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर अनेक बायोपिकने चांगलाच धुमाकूळ घातला. त्या व्यक्तीच्या आयुष्य रूपेरी पडद्यावर

The Paradise Box Office : नानीच्या ‘द पॅराडाईज’ची बॉक्स ऑफिसवर घसरण; 2 दिवसांतच कमाईचा वेग मंदावला

मुंबई : नानी अभिनीत ‘द पॅराडाईज’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईत दुसऱ्या दिवशी मोठी घट झाली आहे. बुधवारी झालेल्या

Panchayat Series: 'मिर्झापूर'नंतर 'पंचायत' सीरीजचाही चित्रपट बनणार का? 'प्रधान जी'ने दोन वाक्यातच सर्व काही सांगितलं...

मुंबई: ओटीटी गाजवल्यानंतर बॉक्स ऑफिसवर 'मिर्झापूर: द मुव्ही' चित्रपट रिलीज झाला होता. ओटीटी प्रमाणेच त्याला बॉक्स

Siddharth Jadhav New Movie : ‘हुप्पा हुय्या’नंतर सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा दिसणार हनुमान भक्ताच्या भूमिकेत; ‘बजरंगी’ चित्रपटाचा फर्स्ट लुक चर्चेत

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा हनुमान भक्ताच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या

Love And War : 'नजर मिलेंगी, लेकिन हटेंगी नहीं'... रणबीर आणि आलियानंतर आता विकी कौशलचा फर्स्ट लूक समोर; रफ अँड टफ अंदाजाची चर्चा

Love And War : संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतिक्षित ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. रणबीर