Influencer House Robbery : सोशल मीडियावर सोनं-रोकड दाखवणं पडलं महागात! इन्फ्लुएन्सरच्या घरातून ₹1 कोटींचा ऐवज चोरीला

सोशल मीडियावर आलिशान जीवनशैली, सोन्या-हिऱ्यांचे दागिने आणि मोठ्या प्रमाणातील रोकड दाखवणाऱ्या कन्याकुमारी येथील इन्फ्लुएन्सर मधुमिता यांच्या नगेर्कोईलमधील घरात मोठी चोरी झाली आहे. चोरट्यांनी घरातील सुमारे ₹1 कोटींचा ऐवज लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट आणि रील्सचीही तपासणी सुरू केली आहे.

कन्याकुमारी : सोशल मीडियावर आलिशान जीवनशैली, सोन्या-हिऱ्यांचे दागिने आणि मोठ्या प्रमाणातील रोकड दाखवणाऱ्या कन्याकुमारी येथील इन्फ्लुएन्सर मधुमिता यांच्या नगेर्कोईलमधील घरात मोठी चोरी झाली आहे. चोरट्यांनी घरातील सुमारे ₹1 कोटींचा ऐवज लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट आणि रील्सचीही तपासणी सुरू केली आहे. (Influencer House Robbery)


मधुमिता यांचे सोशल मीडियावर 4.5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्या नियमितपणे आपल्या पोस्ट आणि व्हिडिओंमधून महागडे दागिने, रोकड आणि आलिशान जीवनशैली दाखवत असतात. काही व्हिडिओंमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड दाखवतानाचे, तसेच एका मुलावर पैसे उधळतानाचे दृश्यही दिसत असल्याची माहिती आहे. (Influencer House Robbery)






पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी मधुमिता यांचे कुटुंब खरेदीसाठी घराबाहेर गेले होते. याच काळात चोरट्यांनी नगेर्कोईलमधील व्हीआयपी गार्डन परिसरातील त्यांच्या घरात प्रवेश केला. घरातील लॉकरमधून दागिने आणि रोकड चोरीला गेली. (Influencer House Robbery)


कुटुंबीय घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. प्राथमिक माहितीनुसार, 960 ग्रॅम सोन्याचे दागिने, हिऱ्यांचे दागिने आणि ₹50 हजार रोख चोरीला गेले आहेत. या ऐवजाची एकूण किंमत जवळपास ₹1 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. (Influencer House Robbery)






दरम्यान, सोशल मीडियावर मौल्यवान वस्तू आणि रोकड दाखवणाऱ्या पोस्टमुळे चोरट्यांना घरातील संपत्ती किंवा कुटुंबाच्या हालचालींबाबत माहिती मिळाली होती का, याचाही पोलिस तपास करत आहेत. (Influencer House Robbery)


या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी 5 विशेष पथके तयार केली आहेत. सोशल मीडिया पोस्ट, रील्स तसेच इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Influencer House Robbery)


Kanyakumari News, Nagercoil News, Influencer Theft, Influencer House Robbery, Social Media Influencer, Jewellery Theft, Gold Theft, ₹1 Crore Theft, 960 Grams Gold, Diamond Jewellery, Cash Theft, Tamil Nadu Crime, Police Investigation, Viral News, Social Media News,

Comments
Add Comment

भारताची अमेरिकेला निर्यात 11 टक्क्यांनी वाढली; सहा महिन्यांत 50.80 अब्ज डॉलरची निर्यात

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यात प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारासाठी (BTA) वाटाघाटी सुरू असतानाच

एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेसकडून सौदी अरेबियाच्या उड्डाणांवरील निर्बंध वाढवले; रियाध-दम्माम सेवा 30 नोव्हेंबरपर्यंत बंद

मुंबई : मध्यपूर्वेतील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन टाटा समूहाच्या एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या विमान

Gilgit Baltistan Van Accident : पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवाशांची व्हॅन नदीत कोसळली; भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू

इस्लामाबाद: पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून (PoK) एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि मोठी दुर्घटना समोर आली आहे.

Eknath Shinde vs Rahul Gandhi: रोज नवा 'फेक नॅरेटिव्ह' रचायचा, हाच गांधी यांचा 'फुल-टाइम' उद्योग, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरमरीत टीका

मुंबई: राहुल गांधी यांना सध्या 'मोदी फोबिया'ने इतके पछाडले आहे, त्यांना उठता-बसता, जागता-झोपता फक्त नरेंद्र

India vs Pakistan U19 Asia Cup Final 2026: भारत पाकिस्तान महामुकाबला, कधी आणि कुठे पाहता येणार सामना?

एसीसी अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हायव्होल्टेज सामना पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे.

Umesh Patil : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरूच नाही; ‘ना औपचारिक, ना अनौपचारिक’

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबाबत गेल्या आठवडाभरापासून माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या