Pune Crime : दार उघडले अन् आरडाओरड झाली! लॉजमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातील एका लॉजमध्ये 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. तरुणीसोबत लॉजमध्ये आलेला तरुण काही वेळाने खोलीतून बाहेर पडला. मात्र, तरुणी बाहेर न आल्याने लॉज कर्मचाऱ्यांनी खोली तपासली असता ती मृतावस्थेत आढळून आली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातील एका लॉजमध्ये 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. तरुणीसोबत लॉजमध्ये आलेला तरुण काही वेळाने खोलीतून बाहेर पडला. मात्र, तरुणी बाहेर न आल्याने लॉज कर्मचाऱ्यांनी खोली तपासली असता ती मृतावस्थेत आढळून आली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

साक्षी संतोष गायकवाड (वय 22, रा. हिवरे, ता. पुरंदर) असे मृत तरुणीचे नाव आहे. साक्षीची पुरंदर तालुक्यातील सासवड येथील विश्वास वामनराव जगताप (देशमुख) (वय 23) याच्याशी जुनी ओळख होती. 24 सप्टेंबर रोजी सकाळी दोघे हडपसर परिसरातील एका लॉजमध्ये गेले होते.






पोलिसांच्या माहितीनुसार, सकाळी साडेनऊच्या सुमारास दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर विश्वास खोलीतून बाहेर पडला. त्यानंतर साक्षीने लॉजच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच लॉज प्रशासनाने पोलिसांना कळवले.

साक्षीच्या मृत्यूची माहिती तिच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विश्वास जगताप याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करत आहेत. पोलिसांकडून लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, दोघांमधील फोनवरील संभाषण आणि कॉल रेकॉर्डचीही माहिती घेतली जात आहे. वाद नेमका कोणत्या कारणामुळे झाला आणि त्यानंतर काय घडले, याचा तपास पोलीस करत आहेत.

 
Comments
Add Comment

भारताची अमेरिकेला निर्यात 11 टक्क्यांनी वाढली; सहा महिन्यांत 50.80 अब्ज डॉलरची निर्यात

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यात प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारासाठी (BTA) वाटाघाटी सुरू असतानाच

एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेसकडून सौदी अरेबियाच्या उड्डाणांवरील निर्बंध वाढवले; रियाध-दम्माम सेवा 30 नोव्हेंबरपर्यंत बंद

मुंबई : मध्यपूर्वेतील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन टाटा समूहाच्या एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या विमान

Gilgit Baltistan Van Accident : पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवाशांची व्हॅन नदीत कोसळली; भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू

इस्लामाबाद: पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून (PoK) एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि मोठी दुर्घटना समोर आली आहे.

Eknath Shinde vs Rahul Gandhi: रोज नवा 'फेक नॅरेटिव्ह' रचायचा, हाच गांधी यांचा 'फुल-टाइम' उद्योग, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरमरीत टीका

मुंबई: राहुल गांधी यांना सध्या 'मोदी फोबिया'ने इतके पछाडले आहे, त्यांना उठता-बसता, जागता-झोपता फक्त नरेंद्र

India vs Pakistan U19 Asia Cup Final 2026: भारत पाकिस्तान महामुकाबला, कधी आणि कुठे पाहता येणार सामना?

एसीसी अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हायव्होल्टेज सामना पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे.

Umesh Patil : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरूच नाही; ‘ना औपचारिक, ना अनौपचारिक’

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबाबत गेल्या आठवडाभरापासून माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या