सिंधुदुर्ग: दरवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 20 ते 25 टक्के पाऊस कमी पडल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अत्यल्प पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘ट्रिगर-1’ (Trigger-1) जाहीर करण्यात आला असून, प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली.
मुंबई : महाराष्ट्रातील दुर्गम, डोंगराळ आणि अरुंद रस्त्यांच्या भागात राहणाऱ्या आदिवासी नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाने मोठा निर्णय ...
ते पुढे म्हणाले, 'गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विहिरींमध्ये निम्मेही पाणी उरलेले नाही आणि भाताची वाढ पूर्णपणे खुंटली आहे. यावर काय कायमस्वरूपी तोडगा काढता येईल, यावर सरकार पातळीवर अभ्यास केला जाईल. कोकणात दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो; त्यामुळे छोटे बंधारे बांधून पाणी साठवल्यास भविष्यात अशी वेळ येणार नाही. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी 100 टक्के खंबीरपणे उभे असून, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना सरसकट आणि जास्तीत जास्त मदत कृतीतून मिळवून दिली जाईल.View this post on Instagram






