Sindhudurg Drought : सिंधुदुर्गात दुष्काळाची स्थिती गंभीर; शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार- मंत्री नितेश राणे

दरवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल २० ते २५ टक्के पाऊस कमी पडल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळ पडले आहे. कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही पाऊस कमी पडल्याचे भातशेतीवर मोठा परिणाम दिसून येत आहे.  या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘ट्रिगर १’ जाहीर करण्यात आला असून, प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरू आहे. मंत्री नितेश राणे यांनीही जिल्ह्यातील काही नुकसानग्रस्त भागांना भेट देत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.

सिंधुदुर्ग: दरवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 20 ते 25 टक्के पाऊस कमी पडल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अत्यल्प पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘ट्रिगर-1’ (Trigger-1) जाहीर करण्यात आला असून, प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली.







यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले, 'राज्यातील 265 तालुके ‘ट्रिगर-1’ अंतर्गत दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करण्यात आले असून, यामध्ये सिंधुदुर्गातील आठही तालुक्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. आज सकाळपासून मी, जिल्हाधिकारी आणि प्रमुख अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. डोळ्यांनी पाहिल्यानंतर प्रत्यक्ष परिस्थिती अधिक स्पष्ट होते. विहिरींमधील पाण्याची पातळी आणि भातशेतीचे झालेले नुकसान पाहिल्यावर सरकारकडे अधिक प्रभावीपणे बाजू मांडता येईल. आमच्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणे हाच या पाहणी दौऱ्याचा मुख्य हेतू आहे.'

पहा व्हिडिओ


ते पुढे म्हणाले, 'गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विहिरींमध्ये निम्मेही पाणी उरलेले नाही आणि भाताची वाढ पूर्णपणे खुंटली आहे. यावर काय कायमस्वरूपी तोडगा काढता येईल, यावर सरकार पातळीवर अभ्यास केला जाईल. कोकणात दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो; त्यामुळे छोटे बंधारे बांधून पाणी साठवल्यास भविष्यात अशी वेळ येणार नाही. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी 100 टक्के खंबीरपणे उभे असून, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना सरसकट आणि जास्तीत जास्त मदत कृतीतून मिळवून दिली जाईल.
Comments
Add Comment

भारताची अमेरिकेला निर्यात 11 टक्क्यांनी वाढली; सहा महिन्यांत 50.80 अब्ज डॉलरची निर्यात

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यात प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारासाठी (BTA) वाटाघाटी सुरू असतानाच

एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेसकडून सौदी अरेबियाच्या उड्डाणांवरील निर्बंध वाढवले; रियाध-दम्माम सेवा 30 नोव्हेंबरपर्यंत बंद

मुंबई : मध्यपूर्वेतील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन टाटा समूहाच्या एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या विमान

Gilgit Baltistan Van Accident : पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवाशांची व्हॅन नदीत कोसळली; भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू

इस्लामाबाद: पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून (PoK) एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि मोठी दुर्घटना समोर आली आहे.

Eknath Shinde vs Rahul Gandhi: रोज नवा 'फेक नॅरेटिव्ह' रचायचा, हाच गांधी यांचा 'फुल-टाइम' उद्योग, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरमरीत टीका

मुंबई: राहुल गांधी यांना सध्या 'मोदी फोबिया'ने इतके पछाडले आहे, त्यांना उठता-बसता, जागता-झोपता फक्त नरेंद्र

India vs Pakistan U19 Asia Cup Final 2026: भारत पाकिस्तान महामुकाबला, कधी आणि कुठे पाहता येणार सामना?

एसीसी अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हायव्होल्टेज सामना पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे.

Umesh Patil : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरूच नाही; ‘ना औपचारिक, ना अनौपचारिक’

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबाबत गेल्या आठवडाभरापासून माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या