ST Buses : आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचणार लालपरी! दुर्गम भागासाठी 100 मिडी बसेस धावणार

मुंबई : महाराष्ट्रातील दुर्गम, डोंगराळ आणि अरुंद रस्त्यांच्या भागात राहणाऱ्या आदिवासी नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील दुर्गम मार्गांवर 100 ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ मिडी बसेस चालवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. (ST Buses)


डोंगर-दऱ्या, तीव्र चढ-उतार आणि अरुंद रस्त्यांमुळे अनेक ठिकाणी मोठ्या एसटी बसेस पोहोचणे शक्य होत नाही. त्यामुळे या भागातील विद्यार्थी आणि नागरिकांना शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ, रुग्णालय किंवा इतर गरजांसाठी अनेक किलोमीटर पायी जावे लागते.



ही समस्या लक्षात घेऊन 28 आसनी मिडी बसेस अशा दुर्गम मार्गांवर चालवण्यात येणार आहेत. विशेषतः ज्या रस्त्यांवर मोठ्या बसेसना जाणे कठीण आहे, तिथे या छोट्या बसेसच्या माध्यमातून सेवा देण्यात येणार आहे. (ST Buses)


या बसेसमुळे विद्यार्थ्यांची दररोजची 10 ते 15 किलोमीटरपर्यंतची पायपीट कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.


या मार्गांवरील बससेवा आर्थिकदृष्ट्या नफ्यात नसेल, तरी त्याकडे केवळ नफा-तोट्याच्या दृष्टिकोनातून पाहिले जाणार नाही, अशी भूमिका मंत्री सरनाईक यांनी मांडली. आदिवासी नागरिक आणि विद्यार्थ्यांना शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि इतर सुविधांशी जोडणे हे या सेवेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.



‘गाव तिथे एसटी’नंतर आता ‘वाडी-वस्ती तिथे एसटी’ या दिशेने महामंडळाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दुर्गम महाराष्ट्रातील अनेक वाड्या-वस्त्यांना सार्वजनिक वाहतुकीची सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. (ST Buses)


Comments
Add Comment

दुष्काळग्रस्त तालुक्यांना सरसकट मदत करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळं काही स्पष्ट सांगितलं

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा अडचणीत आला आहे. हाताशी आलेलं पिक करपून जात

ReelStar Divya Shinde : डॉक्टरच्या घरात घुसली आणि... रिलस्टार दिव्या शिंदेवर थेट खंडणीचा गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

पुणे : पुण्यात  (Pune) सोशल मीडिया रीलस्टार दिव्या शिंदे  (Divya Shinde) हिच्याविरोधात गंभीर आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाने घेतला ब्रेक! 27 सप्टेंबरला कसा राहील हवामानाचा अंदाज?

महाराष्ट्रातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत असून अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. काही ठिकाणी

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कंटेनरला कारची धडक, एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरमध्ये शनिवारी (ता. 26) सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण

Ganeshotsav 2026 : महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची परदेशी पर्यटकांनाही भुरळ; बाप्पाच्या विसर्जनात उत्साहाने सहभाग

मुंबई : मुंबईतील गिरगाव चौपाटीवर झालेल्या गणेश विसर्जन सोहळ्यात 23 देशांतील आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी उत्साहाने

Eknath Shinde : दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेना देणार मदतीचा हात

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; स्थानिक लोकप्रतिनीधी आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई