Sunday, September 27, 2026

‘शेतकरी एकटा नाही’… देवाभाऊंचा शेतकऱ्यांना आधार; आमदार चित्रा वाघ काय म्हणाल्या ?

‘शेतकरी एकटा नाही’… देवाभाऊंचा शेतकऱ्यांना आधार; आमदार चित्रा वाघ काय म्हणाल्या ?

मुंबई : शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पाहून निर्णय घेणं, हीच खरी संवेदनशीलता असल्याचे प्रतिपादन करत भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चित्रा किशोर वाघ यांनी महायुती सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यातील 265 तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला असून, बळीराजाला मोठा दिलासा देणारी पावले उचलली आहेत.(Drought Maharashtra)

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण दिलासा

राज्यातील वाढत्या दुष्काळी परिस्थितीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यातील तब्बल 265 तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. या माध्यमातून शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी शासनाकडून खालीलप्रमाणे उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत:

  • कर्जवसुलीला स्थगिती: दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या शेती कर्जाच्या वसुलीला तात्काळ स्थगिती देण्यात आली आहे.
  • पीक कर्जाचे पुनर्गठन: शेतकऱ्यांना आगामी काळात आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी पीक कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे.
  • महसूल व वीजबिलात सवलत: जमीन महसूल माफीसह वीजबिलामध्ये विशेष सवलत देण्यात आली आहे.(Drought Maharashtra)
  • चारा व पाण्याची व्यवस्था: ग्रामीण भागात जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

?feature=share

"शेतकरी एकटा नाही, सरकार पाठीशी आहे"

या निर्णयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार चित्रा किशोर वाघ यांनी म्हटले की, संकटात सापडलेल्या बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारा हा निर्णय आहे. "शेतकरी एकटा नाही, सरकार त्याच्या पाठीशी आहे... हा विश्वास देवाभाऊंनी (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) दिलाय," असे त्या म्हणाल्या.तसेच, प्रत्यक्ष बांधावर जाऊन बळीराजाचे अश्रू पुसणारा आणि त्यांना प्रत्यक्ष आधार देणारा मुख्यमंत्री आणि वातानुकूलित कक्षातून निर्णय घेणारे 'ऑनलाइन मुख्यमंत्री' यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो, असे सांगत त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. या सर्वसमावेशक निर्णयामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला असून शासन पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे स्पष्ट झाले आहे.(Drought Maharashtra)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >