Sunday, September 27, 2026

Free Aadhaar Card Update : मुलांचे आधार कार्ड अपडेट केले का? 30 सप्टेंबरपर्यंत मिळणार मोठी सवलत; नाहीतर...

Free Aadhaar Card Update : मुलांचे आधार कार्ड अपडेट केले का? 30 सप्टेंबरपर्यंत मिळणार मोठी सवलत; नाहीतर...

आधार कार्ड हे  भारतातील महत्त्वाचे ओळखपत्र असून अनेक सरकारी आणि शैक्षणिक कामांसाठी त्याचा वापर केला जातो. मुलांच्या आधारमध्ये वयानुसार बायोमेट्रिक माहिती अपडेट करणे आवश्यक असते. आता 5 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट मोफत करण्याची मुदत 30 सप्टेंबर 2026 पर्यंत असल्याची माहिती UIDAI ने दिली आहे.  (Aadhar Update)

मुलांचे 15 वर्षे पूर्ण झाल्यावर बायोमेट्रिक अपडेट करणे आवश्यक

लहान मुलांचे आधार तयार करताना सुरुवातीला बायोमेट्रिक माहिती घेतली जात नाही. मुलाचे वय 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर फोटो, बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या बुबुळांची माहिती आधारमध्ये अपडेट केली जाते. त्यानंतर वयाची 15 वर्षे पूर्ण झाल्यावर पुन्हा बायोमेट्रिक अपडेट करणे आवश्यक असते. UIDAI च्या माहितीनुसार, 5 ते 7 वर्षे आणि 15 ते 17 वर्षे वयोगटातील अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट सामान्यतः मोफत आहे.

30 सप्टेंबरपर्यंत अपडेट करणे मोफत

दरम्यान, 7 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांच्या पहिल्या अनिवार्य बायोमेट्रिक अपडेटसाठी UIDAI ने 1 ऑक्टोबर 2025 पासून एका वर्षासाठी शुल्क माफ केले आहे. त्यामुळे 30 सप्टेंबर 2026 पर्यंत या वयोगटातील पात्र मुलांनाही हे अपडेट मोफत करता येणार आहे. (Biometric Update)

आधार बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी पालकांनी मुलाला जवळच्या आधार नोंदणी किंवा आधार सेवा केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे. UIDAI च्या माहितीनुसार, या प्रक्रियेसाठी आधार क्रमांकासह आधार केंद्राला भेट द्यावी लागते.

मुलांचे आधार वेळेत अपडेट केल्यास शाळा-महाविद्यालयातील प्रवेश, शिष्यवृत्ती, सरकारी योजनांचा लाभ तसेच विविध परीक्षांमधील आधार आधारित ओळख पडताळणीच्या वेळी येणाऱ्या अडचणी टाळण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे पात्र मुलांचे बायोमेट्रिक अपडेट 30 सप्टेंबरपूर्वी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >