मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ऑगस्ट 2026 महिन्याचा ₹1,500 चा हप्ता रखडल्यामुळे लाभार्थी महिलांकडून पैसे कधी जमा होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता ऑगस्टच्या हप्त्यासाठी निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात पैसे टप्प्याटप्प्याने जमा होण्याची शक्यता आहे. (Ladki Bahin Yojana August Installment)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या आधार-संलग्न बँक खात्यात दरमहा ₹1,500 थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून जमा केले जातात.
ऑगस्ट महिन्याचा हप्ता वेळेत जमा न झाल्याने गणेशोत्सवाच्या काळात लाभार्थी महिलांचे लक्ष या रकमेच्या प्रतीक्षेकडे लागले होते. आता शासनाकडून हप्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया पुढे सरकली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थींना लवकरच त्यांच्या खात्यात ₹1,500 जमा झाल्याचा संदेश मिळू शकतो. (Ladki Bahin Yojana August Installment)
नागपूर : अपुऱ्या पावसामुळे महाराष्ट्रातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या तालुक्यांमध्ये दुष्काळ व्यवस्थापनाच्या पहिल्या ...
पैसे खात्यात आले की नाही, हे कसे तपासता येईल ?
हप्ता जमा झाल्याचा मोबाईलवर मेसेज आला नाही, तरी काही सोप्या पद्धतींनी खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासता येईल.
- बँकेच्या कस्टमर केअरवर संपर्क करून खात्यातील शिल्लक तपासा.
- मोबाईल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंगमधून बँक स्टेटमेंट तपासा.
- बँकेच्या अॅपमध्ये खात्यातील व्यवहार पाहा.
- जवळच्या बँक शाखेत जाऊन खात्यात ₹1,500 जमा झाले आहेत का, याची खात्री करा.
दरम्यान, योजनेशी संबंधित कोणतीही लिंक किंवा अनोळखी संदेशावर क्लिक करण्याऐवजी अधिकृत महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवरूनच माहिती तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Ladki Bahin Yojana August Installment)






