Sunday, September 27, 2026

1...100...15000! विराट कोहलीने गाठला मैलाचा दगड, क्रिकेट विश्वात अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज

1...100...15000! विराट कोहलीने गाठला मैलाचा दगड, क्रिकेट विश्वात अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा विराट कोहली जबरदस्त फॉर्मात असल्याचं दिसून आला. त्याचा आत्ममविश्वासाचा प्रश्नच नव्हता. रोहित शर्माची विकेट पडल्यानंतर मैदानात उतरला आणि आक्रमक खेळ दाखवला. त्याने कर्णधार शुभमन गिलला उत्तम साथ दिली. तसेच वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना विकेटसाठी झुंजवलं.त्याने नुसतं झुंजवलं नाही तर अर्धशतक खेळीसह वनडे क्रिकेटमध्ये एक मैलाचा दगडही गाठला. वनडे क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर 15 हजार धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने या सामन्यात अर्धशतक पूर्ण केलं असून आता शतकाच्या दिशेने कूच केली आहे.

15 हजारी विराट कोहली

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 463 वनडे सामन्यात 18426 धावांची खेळी केली आहे. आता त्या खालोखाल आता विराट कोहलीचं नाव आलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात त्याने 15 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकारा आहे. त्याने 404 वनडे डावात 14234 धावा केल्या आहे. चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉटिंग असून त्याने 375 डावात 13704 धावा केल्या आहेत. तर सनथ जयसूर्या 13430 धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने 445 सामन्यात 32.4 च्या सरासरीने धावा केल्या.

विराट कोहलीने सचिन तेंडुलकरला टाकलं मागे

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वयाच्या 34 वर्षे आणि 66 दिवसांचे असताना हा टप्पा पार केला होता, तर रनमशीन विराट कोहलीने वयाच्या 37 वर्षे आणि 326 दिवसांचे असताना हा पराक्रम केला. म्हणजेच वयाच्या बाबतीत सचिनने हा विक्रम आधी केला असला, तरी कमी डावांमध्ये हा टप्पा गाठण्याचा विक्रम विराटच्या नावावर झाला आहे. विराटने अवघ्या 303 डावांमध्ये 15 हजार धावा पूर्ण केल्या, तर सचिनला यासाठी 377 डाव खेळावे लागले होते. विराटने केवळ 15950 चेंडूंचा सामना करत हा टप्पा गाठला, तर सचिनने यासाठी 17528 चेंडू घेतले. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पणापासून रेकॉर्ड मोजला सचिनला इथपर्यंत पोहोचण्यासाठी 6402 दिवस लागले, तर विराट कोहलीने पदार्पणानंतर 6614 दिवसांत या विक्रमाला गवसणी घातली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >