सहाअनधिकृत स्टॉलसह ५६ ओटे तोडले
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘पेडेस्ट्रियन फर्स्ट’ अभियानांतर्गत दादर येथील एम. सी. जावळे मार्गावर व्यापक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान रस्ता तसेच पदपथावर करण्यात आलेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटवून संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये विशेषतः दुकानांबाहेरील वाढीव बांधकाम तोडण्यात आले आहे. (BMC Encroachment Drive)
[caption id="attachment_1061947" align="alignnone" width="696"]
फोटो सौजन्य : प्रहार डॉट इन[/caption]
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये कृत्रिम तलाव, नैसर्गिक तलाव आणि चौपाट्यांवर सार्वजनिक गणेश मुर्तींचे आणि घरगुती गणेश मुर्तींचे ...
महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार, परिमंडळ २ चे उपायुक्त प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या धडक कारवाईत ६ अनधिकृत स्टॉल, ५६ ओटे तसेच ९ झाडांभोवती उभारण्यात आलेले अनधिकृत चौथरे हटविण्यात आले. त्यामुळे एम. सी. जावळे मार्गावरील रस्ता आणि पदपथ मोठ्या प्रमाणात मोकळा झाला असून, पादचाऱ्यांना सुरक्षित आणि सुलभपणे ये-जा करण्यासाठी मार्ग उपलब्ध झाला आहे. (BMC Encroachment Drive)
[caption id="attachment_1061948" align="alignnone" width="696"]
फोटो सौजन्य : प्रहार डॉट इन[/caption]
मुंबई: गोरेगाव आणि मुलुंडवाकरांसाठी आनंदाची बातमी म्हणता येईल. गोरेगाव - मुलुंड लिंक रोड (GMLR)प्रकल्पाचा गोरेगाव ते फिल्म सिटी (दादासाहेब फाळके ...
महापालिकेच्या जी/उत्तर विभागातील विविध खात्यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तपणे या मोहिमेत सहभाग घेतला. रस्ते व पदपथांवरील अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेता, अशा प्रकारच्या कारवायांमुळे पादचारी-केंद्रित वाहतूक व्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होणार आहे. पदपथ पादचाऱ्यांसाठीच, रस्ते वाहतुकीसाठीच या भूमिकेतून महापालिकेने ‘पेडेस्ट्रियन फर्स्ट’ अभियानांतर्गत अतिक्रमणांविरोधातील कारवाईला प्राधान्य दिले आहे. या कारवाईचा भाग असून गणेशोत्सवातही या दाटीवाटीच्या रस्त्यावर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली.(BMC Encroachment Drive)




