मुंबई: अभिनेता रणबीर कपूर सध्या 'रामायण' आणि 'लव्ह अँड वॉर' या अपकमिंग चित्रपटामुळे चांगलाच प्रकाशझोतात आहे. सध्या त्याची सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. कायमच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणाऱ्या रणबीरचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. रणबीर पापाराझींवर भडकलेला पाहायला मिळत आहे. सध्या इन्स्टाग्रामवर रणबीरच्या ह्या व्हिडिओची चांगलीच चर्चा होताना पाहायला मिळत आहे. नेमका अभिनेता पापाराझींवर का भडकला? जाणून घेऊया...
मुंबई : बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आता छोट्या पडद्यावर एका अगदी नव्या आणि रंजक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. ...
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित, 'ॲनिमल'चित्रपटानंतर तब्बल अडीच वर्षांच्या गॅपनंतर रणबीर 'रामायण' आणि 'लव्ह अँड वॉर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'लव्ह अँड वॉर' चित्रपटानिमित्त रणबीर कपूर, आलिया भट्ट, विकी कौशल आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे चौघेही पापाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये एकत्र कैद झाले. याचदरम्यान पापाराझीच्या एका कृतीमुळे अभिनेता रणबीर कपूर कमालीचा संतापलेला पाहायवा मिळाला. ह्या चौघांनीही कॅमेऱ्यासमोर पोजेस दिल्यानंतर खाली उतरत होते. एका पापाराझीने अभिनेत्याला आवाज दिल्यामुळे तो त्यावर कमालीचा संतापलेला पाहायला मिळाला.
View this post on Instagram
रणबीर, आलिया, विकी आणि दिग्दर्शक भन्साळी हे चौघेही मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर एकत्र स्पॉट झाले होते. रेस्टॉरंटच्या बाहेर येत असताना त्यांना पापाराझींनी घेरलं. त्यानंतर चौघांनीही एकत्रित पोजेसही दिल्या. त्यांच्या पोजेसने नेटकऱ्यांचे मनही जिंकले. फोटोसेशन झाल्यानंतर खाली उतरत असताना एका पापाराझीने रणबीरला जोरात आवाज दिला. त्यामुळे त्याला राग आला. पापाराझीने अभिनेत्याला आवाज दिल्यानंतर तो कमालीचा संतापला. रणबीर पापाराझीला, "खूपच बोलतोयस तू..." असं बोलून पुढे निघुन गेला. रणबीरचं हेच वक्तव्य सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मुंबई: अभिनेत्री म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर पटकन स्लिम- ट्रीम असलेली अभिनेत्री नजरेसमोर येते. पण त्याला अपवाद अभिनेत्री अंजली आनंद आहे. अभिनय आणि ...
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित, 'लव्ह अँड वॉर' चित्रपटामध्ये रणबीर- आलिया आणि विकी हे तिन्ही सेलिब्रिटी एकत्र दिसणार आहेत. अलीकडेच या तिन्ही सेलिब्रिटींचे चित्रपटातील पोस्टर रिलीज झाले आहेत, चित्रपटाचं कथानक अद्याप रिव्हिल झालेलं नाही. हा चित्रपट 21 जानेवारी 2027 ला रिलीज होणार आहे. रणबीर कपूरकडे सध्याच्या घडीला दोन मोठे प्रोजेक्ट्स आहेत. 'लव्ह अँड वॉर' व्यतिरिक्त, तो नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण'मध्ये चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता रामाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याचा पहिला भाग 2026 च्या दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार आहे.




