
मुंबई: पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यात महाराष्ट्राला चित्रपट चित्रीकरण आणि चित्रपट पर्यटनाचे ...
कोणत्या गाण्यांवर मज्जाव करण्याची मागणी करण्यात आली आहे?
• पटियाला पैग (Patiala Peg) • 5 तारा (5 Taara Theeke) • जेब विचो अफीम / जेब विचो फीम (Jeeb Vicho Feem) • जट्ट फायर करदा / जट्ट उठे फायर करदा (Jatt Fire Karda)
या गाण्यांच्या गीतामध्ये दारू, अफू, अमली पदार्थ आणि शास्त्रे यांचा उल्लेख असल्याने मुलांवर आणि तरुणांवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. दिलजीत दोसांझच्या परफॉर्मन्समध्ये मद्यपान, नशा आणि हिंसाचाराला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे लहान मुलांवर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच, कॉन्सर्टमध्ये लहान मुलांना स्टेजवर बोलावणे, मोठ्या आवाजातील संगीत आणि लेझर लाईट्समुळे होणाऱ्या धोक्यांबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय, त्यांच्या कॉन्सर्टमधील 'बंदूक आणि बुलेट बेल्ट' परिधान करण्यावरही आक्षेप नोंदवण्यात आला आहे. यापूर्वी 15 नोव्हेंबर रोजी इंदूर येथे होणाऱ्या त्यांच्या कॉन्सर्टवरही अशाच प्रकारची पाबंधी लावण्याची मागणी करण्यात आली होती. 15 नोव्हेंबर रोजी इंदूरमध्ये दिलजीतचा कार्यक्रम सादर करणार आहे. त्याआधीच शहरातील तीन बँका आणि महापौरांच्या सचिवालयाला बॉम्ब हल्ल्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. या धमक्या ईमेलद्वारे पाठवण्यात आल्या आहेत. हे ईमेल पंजाबी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये लिहिलेले आहेत. तसेच धमकीच्या ईमेलमध्ये बंधन बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक आणि इंदूर महापौर सचिवालय यांना लक्ष्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या ईमेलनंतर, बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाचे एक पथक महापौर सचिवालयात दाखल झाले आणि त्यांनी परिसराची कसून तपासणी केली.





