हा झेल पाहिलात का? सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियाच्या कूपर कॉनोलीचा अप्रतिम कॅच Video

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने विजय मिळवला असून 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात कमबॅकचं मोठं आव्हान ऑस्ट्रेलियासमोर आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण टेम्बा बावुमा आणि डेविड मिलर यांच्या झुंजार खेळीमुळे ऑस्ट्रेलियन संघ पुन्हा एकदा बॅकफूटवर गेला. दक्षिण अफ्रिकेने 50 षटकात 9 गडी गमवून 365 धावांची खेळी केली. तसेच विजयासाठी 366 धावांचं आव्हान दिलं. खरं तर दक्षिण अफ्रिकेची सुरूवात काही खास झाली नव्हती. पहिल्याच चेंडूवर एड मार्करमची विकेट पडली होती. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेचा संघ बॅकफूटवर जाईल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. दक्षिण अफ्रिकेने जोरदार कमबॅक केलं. दुसरीकडे, पहिल्याच चेंडूवर मिळालेल्या विकेटचं तितकंच कौतुक होत आहे. त्याला कारणंही तसंच आहे. ऑस्ट्रेलियाच्या कूपर कॉनोलीने अप्रतिम झेल पकडला.


दुसऱ्या वनडे सामन्यातून दक्षिण अफ्रिकेचा स्टार फलंदाजी एडन मार्करम कमबॅक करत होता. कारण पहिल्या सामन्यात खेळला नव्हता. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. पण पहिल्याच चेंडूवर बाद होत तंबूत परतावं लागलं. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर एडन मार्करमने कट शॉट मारला. हा शॉट मारताना त्याचं टायमिंग आणि हाइटही चांगली होती. पण त्याचं नशिब काही चांगलं नव्हतं. बॅकवर्ड प्वॉइंटला असलेल्या कूपर कॉनोलीने मोक्याच्या क्षणी उडी मारली आणि डाव्या हात वर करून अप्रतिम झेल पकडला. चेंडू हातात बसलेला पाहून एडन मार्करमही आवाक् झाला. इतका अप्रतिम फटका मारला होता, पण नशिबाची साथ काही मिळाली नाही.






पहिल्या चेंडूवर विकेट मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने दक्षिण अफ्रिकेवर दबाव टाकला. जोश हेझलवूडला दुसरी विकेट काढण्यासाठी फार काही वेळ लागला नाही. सातव्या षटकात जोश हेझलवूडने क्विंटन डीकॉकला तंबूचा रस्ता दाखवला. जोश हेझलवूडने 10 षटकात 70 धावा देत 3 गडी बाद केले. तर जॅक एडवर्डसने 10 षटकात 67 धावा देत 5 विकेट काढल्या. तर झेव्हियर बार्टलेटच्या वाटेला एक विकेट आली. दक्षिण अफ्रिकेकडून टेम्बा बावुमाने 113 आणि डेविड मिलरने142 धावांची खेळी केली.


Comments
Add Comment

IND vs AFG: एशियन गेम्समध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तान महामुकाबला; कधी आणि कुठे पाहायचा सामना?

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारतीय महिला संघाने सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली आहे. आता भारतीय पुरूष संघाकडून तशाच

कुलदीप यादवच्या फिरकीमुळे वेस्ट इंडिजच्या धावगतीला ब्रेक, भारतापुढे 296 धावांचं आव्हान

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला वनडे सामना तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये

विंडीज ओपनर्सचा भारतीय भूमीवर 22 वर्षांनंतर मोठा धमाका; कॅम्पबेल आणि ग्रीव्ह्सने रचला इतिहास!

भारत वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना

वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेपूर्वी विराट कोहलीचा चाहत्यांना धक्का, वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेबाबत थेट सांगून टाकलं

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून वनडे मालिका सुरू होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहली आणि

अजून काही संपलं नाही...! वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेपूर्वी रोहित शर्माचं मोठं विधान, मनात नेमकं काय आहे सुरू?

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी टीम इंडियाची मोर्चेबांधणी सुरू आहे. यासाठी भारतीय संघात खेळाडूंची चाचपणी सुरू आहे.

PV Sindhu Asian Games 2026 : पी.व्ही. सिंधूचा दमदार विजय; मियाझाकीला मागे टाकत Asian Games 2026 च्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

PV Sindhu Asian Games 2026 : भारताची स्टार बॅडमिंटनपटू PV सिंधूने Asian Games 2026 मध्ये दमदार कामगिरी करत जपानच्या टोमोका मियाझाकीचा सरळ