Sunday, September 27, 2026

विंडीज ओपनर्सचा भारतीय भूमीवर 22 वर्षांनंतर मोठा धमाका; कॅम्पबेल आणि ग्रीव्ह्सने रचला इतिहास!

विंडीज ओपनर्सचा भारतीय भूमीवर 22 वर्षांनंतर मोठा धमाका; कॅम्पबेल आणि ग्रीव्ह्सने रचला इतिहास!

भारत वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना तिरुवनंतपुरम येथे सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारतीय कर्णधार शुभमन गिलने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजचे विकेट झटपट काढून दिलेल्या धावांचा पाठलाग करण्याच मानस होता. पण वेस्ट इंडिजने चांगली सुरूवात केली आणि भारतीय गोलंदाजांना बॅकफूटवर ढकललं. वेस्ट इंडिजची पहिली विकेट 135 धावांवर पडली. कुलदीप यादवला ही जोडी फोडण्यात यश आलं. जॉन कॅम्पबेल 62 धावांवर असताना कुलदीप यादवने त्याची विकेट काढली. मात्र तिथपर्यंत सलामीच्या जोडीने आपलं चोख बजावलं होतं. जॉन कॅम्पबेल आणि जस्टीन ग्रीव्ह्स या सलामी जोडीने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत मजबूत पाया रचला आणि विक्रमही रचला. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये ख्रिस गेल आणि इव्हिन लुईस यांच्या 115 धावांच्या भागीदारीनंतर 2019 नंतर वेस्ट इंडिजची भारताविराधात ही पहिली 100हून अधिक धावांची सलामी भागीदारी ठरली.

वेस्ट इंडिजच्या जोडीने 2002 नंतर पहिल्यांदाच असं केलं

भारतामध्ये वेस्ट इंडिजच्या सलामी जोडीने 100हून अधिक धावा जोडण्याची ही 2002 नंतरची पहिलीच वेळ आहे. यापूर्वी 2002 मध्ये वडोदरा येथे ख्रिस गेल आणि रायन हिंड्स यांनी 132 धावांची भागीदारी केली होती. जॉन कॅम्पबेल (62 धावा) आणि जस्टीन ग्रीव्ह्स (66धावा) हे 2009 नंतर भारताविरुद्धच्या वनडेत एकत्र अर्धशतक झळकावणारे पहिले विंडीज ओपनर्स बनले आहेत. दुसरीकडे जॉन कॅम्पबेलची विकेट पडल्यानंतरही ग्रीव्ह्सने मैदानात तग धरला आणि शतकाच्या दिशेन कूच केली आहे.

विंडीजच्या जोडीची तिसरी सर्वोत्तम भागीदारी

तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमवर रचलेली 135 धावांची ही भागीदारी, भारतातील वेस्ट इंडिजची भारताविरुद्धची तिसरी सर्वोच्च सलामी भागीदारी ठरली आहे. जी ग्रीनडिज आणि डी हेन्स या जोडीने इंदूरमध्ये 1983 मध्ये 149 धावांची भागीदारी, तर जी ग्रीनडिज आणि पी सिमन्स या जोडीने तिरुवनंतपुरम 164 धावांची भागीदारी केली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >