पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातील एका लॉजमध्ये 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. तरुणीसोबत लॉजमध्ये आलेला तरुण काही वेळाने खोलीतून बाहेर पडला. मात्र, तरुणी बाहेर न आल्याने लॉज कर्मचाऱ्यांनी खोली तपासली असता ती मृतावस्थेत आढळून आली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.
साक्षी संतोष गायकवाड (वय 22, रा. हिवरे, ता. पुरंदर) असे मृत तरुणीचे नाव आहे. साक्षीची पुरंदर तालुक्यातील सासवड येथील विश्वास वामनराव जगताप (देशमुख) (वय 23) याच्याशी जुनी ओळख होती. 24 सप्टेंबर रोजी सकाळी दोघे हडपसर परिसरातील एका लॉजमध्ये गेले होते.
BMC Health Department : केईएम, शीव रुग्णालयातील एंडोस्कोपिक मशीन्सची खरेदी बाळगळली
तीन वर्षांपूर्वी खरेदीला दिलेल्या मंजुरीचा प्रस्ताव आता रद्द करायला निघाले प्रशासन
मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महानगरपालिकेच्या विविध ...
पोलिसांच्या माहितीनुसार, सकाळी साडेनऊच्या सुमारास दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर विश्वास खोलीतून बाहेर पडला. त्यानंतर साक्षीने लॉजच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच लॉज प्रशासनाने पोलिसांना कळवले.
साक्षीच्या मृत्यूची माहिती तिच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विश्वास जगताप याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करत आहेत. पोलिसांकडून लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, दोघांमधील फोनवरील संभाषण आणि कॉल रेकॉर्डचीही माहिती घेतली जात आहे. वाद नेमका कोणत्या कारणामुळे झाला आणि त्यानंतर काय घडले, याचा तपास पोलीस करत आहेत.