वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेपूर्वी विराट कोहलीचा चाहत्यांना धक्का, वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेबाबत थेट सांगून टाकलं

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून वनडे मालिका सुरू होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा प्लेइंग 11 चा भाग असतील यात काही शंका नाही. या दोघांच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे. असं असताना या सामन्यापूर्वी विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि भविष्याबाबत मोठं विधान केलं आहे. 37 विराट कोहलीने वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेबाबत आपलं म्हणणं स्पष्ट केलं आहे. त्याच्या विधानामुळे गेल्या काही दिवसांपासून उडालेला धुराळा शांत झाला आहे. विराट कोहलीने स्पष्ट केलं की, दक्षिण अफ्रिकेत होणारी 2027 वर्ल्डकप स्पर्धा ही त्याच्यासाठी शेवटची स्पर्धा असणार आहे. विराट कोहलीने सांगितलं की, 'हा भारतासाठी माझा शेवटचा विश्वचषक असेल आणि हीच माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे.'

विराट कोहली जबरदस्त फॉर्मात आहे. 2026 मध्ये खेळलेल्या सहा वनडे सामन्यात त्याने 64 च्या सरासरीने384 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. तर शेवटच्या दहा वनडे सामन्यात त्यानेतीन शतकं आणि पाच अर्धशतकं ठोकली आहेत. विराट कोहलीने वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेबाबत सांगितलं की, 'मला मैदानावर माझे सर्वस्व द्यायचे आहे. विश्वचषक जिंकणे हे आमचे निश्चित ध्येय आहे आणि त्यासाठी जे काही त्याग आणि कठोर परिश्रम लागतील, त्यासाठी मी तयार आहे.' विराट कोहलीचा फॉर्म पाहता वेस्ट इंडिजविरुद्ध चांगली कामगिरी असं दिसत आहे. पण मागच्या दोन वनडे मालिकांचा विचार केला तर त्याला फार काही यश मिळालेलं नाही. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.


कर्णधार शुभमन गिलवर उधळली स्तुतीसुमनं!


विराट कोहलीने कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाचंही कौतुक केलं. विराट कोहली म्हणाला की, 'शुभमन कर्णधार म्हणून बरंच काही शिकत आहे आणि या भूमिकेत तो नवीन आहे. पण टीम इंडियाचे नेतृत्व करण्यासाठी त्याच्याकडे योग्य वृत्ती आणि आक्रमकता आहे. मैदानावर आपण कसे खेळले पाहिजे याबद्दलच्या त्याच्या योजना खूप स्पष्ट आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, संघाला योग्य दिशेने नेण्याची जिद्द त्याच्यामध्ये आहे.'
Comments
Add Comment

अजून काही संपलं नाही...! वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेपूर्वी रोहित शर्माचं मोठं विधान, मनात नेमकं काय आहे सुरू?

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी टीम इंडियाची मोर्चेबांधणी सुरू आहे. यासाठी भारतीय संघात खेळाडूंची चाचपणी सुरू आहे.

PV Sindhu Asian Games 2026 : पी.व्ही. सिंधूचा दमदार विजय; मियाझाकीला मागे टाकत Asian Games 2026 च्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

PV Sindhu Asian Games 2026 : भारताची स्टार बॅडमिंटनपटू PV सिंधूने Asian Games 2026 मध्ये दमदार कामगिरी करत जपानच्या टोमोका मियाझाकीचा सरळ

IND vs WI: पहिल्या वनडेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! प्लेइंग 11 मध्ये होणार मोठे बदल, कारण की...

भारत आणि वेस्ट इंडिया यांच्यातील पहिला वनडे सामना 27 सप्टेंबरला होत आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार सराव

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी वृद्धाश्रमात? व्हायरल व्हिडिओमध्ये स्वतःच दिली माहिती, म्हणाला...

भारताचा माजी स्टार फलंदाज सचिन तेंडुलकर आणि डावखुरा फलंदाज विनोद कांबळी यांची मैत्री क्रिकेटविश्वात सर्वश्रूत

Asian Games 2026 : इराणला धूळ चारत भारतीय महिला कबड्डी संघाने पटकावले ऐतिहासिक सुवर्णपदक

नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेतून भारतासाठी एक अतिशय अभिमानास्पद आणि सुवर्णमय बातमी समोर आली आहे. भारताच्या

Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांचा पराक्रम; भारताच्या खात्यात आणखी एक रौप्य पदक!

नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या महिला नेमबाजांनी पुन्हा एकदा तिरंगा फडकवला आहे. महिलांच्या 50