Sunday, September 27, 2026

Pitru Paksha 2026: पितृपक्षात कोणत्या गोष्टी टाळाव्यात, पंधरवड्यात काय काळजी घ्यावी? जाणून घ्या

Pitru Paksha 2026: पितृपक्षात कोणत्या गोष्टी टाळाव्यात, पंधरवड्यात काय काळजी घ्यावी? जाणून घ्या
भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष हा आपल्या पितरांसाठी समर्पित आहे. या 15 दिवसांच्या कालावधीत आल्या प्रियजनांच्या मृत्यूतिथीनुसार श्राद्ध, तर्पण, पिंडदान यासारखे धार्मिक विधी केले जातात. तसेच सर्वपित्री अमावास्येला सर्व पूर्वजांचं एकत्रित स्मरण केलं जातं. त्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळावा म्हणून हे 15 दिवस खूप महत्त्वाचे आहे. हिंदू धर्मात या पितृ पंधरवड्याचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. पितृपक्ष 27 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाला असून 10 ऑक्टोबर 2026 पर्यंत असणार ाहे.. पितृपक्षात विधीनुसार श्राद्ध विधी केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. तसेच कुटुंबात शांतता आणि आनंद टिकून राहतो. असं असताना या कालावधीत काही नियमही पाळणं गरजेचं आहे. या काळात शुभ कार्य, मांसाहार आणि नवीन गोष्टी घेण्याचा मोह टाळण्यास सांगितलं गेल आहे. तसेच केस आणि नखं कापण्यापासून नियम सांगितले गेले आहेत.

पितृपक्षात काय करू नये?

पितृपक्षात शास्त्रानुसार शुभ कार्य करण्यास मनाई केली गेली आहे. या काळात विवाह, साखरपुडा, मुंडन, गृहप्रवेश आणि नवीन कामं करणं अशुभ मानलं गेलं आहे. तसेच, तामसिक पदार्थ खाण्यास टाळावं. जसं कीस लसूण, कांदा, मांस, अंडी आणि मद्य याचं सेवन करू नये. तसेच मसूर, उडद डाळ आणि चणे खाणं वर्ज्य करावं. या कालावधीत नखं आणि केस कापू नये. घरात वाद होईल असं गोष्टी करू नका. वृद्ध व्यक्तीचा, महिलेचा किंवा गरजूचा अपमान करणं टाळा. पितृपक्षात सूर्यास्तानंतर किंवा संध्याकाळी घर झाडण्यास मनाई आहे. तसेच पितृपक्षाच्या पूजेसाठी किंवा तर्पणासाठी लोखंडी भांड्याचा वापर निषिद्ध मानला गेला आहे.

पितृपक्षात काय करावं?

पितृपक्षात पूर्वजांचा आशीर्वाद मिळावा यासाठी दक्षिणेला तोंड करून कुशा आणि काळे तीळ मिश्रीत जल अर्पित करावं. तसेच पाचबली भोग म्हणजेच अन्न शिजवल्यानंतर त्यातील काही भाग गाय, कावळा, कुत्रा, देव आणि मुंग्यांना द्यावा. आपल्या आर्थिक स्थितीनुसार, गरजू, गरीबांना अन्न, जेवण किंवा वस्त्र दान करावं. या पंधरवड्यात सात्विक आहार आणि ब्रह्मचर्चाचं पालण ठेवावं (Disclaimer: या बातमीतील माहिती धार्मिक श्रद्धा आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. प्रहार डॉट इन त्याचे समर्थन करत नाही.)
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >