Pitru Paksha 2026: पितृपक्षात कोणत्या गोष्टी टाळाव्यात, पंधरवड्यात काय काळजी घ्यावी? जाणून घ्या

भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष हा आपल्या पितरांसाठी समर्पित आहे. या 15 दिवसांच्या कालावधीत आल्या प्रियजनांच्या मृत्यूतिथीनुसार श्राद्ध, तर्पण, पिंडदान यासारखे धार्मिक विधी केले जातात. तसेच सर्वपित्री अमावास्येला सर्व पूर्वजांचं एकत्रित स्मरण केलं जातं. त्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळावा म्हणून हे 15 दिवस खूप महत्त्वाचे आहे. हिंदू धर्मात या पितृ पंधरवड्याचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. पितृपक्ष 27 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाला असून 10 ऑक्टोबर 2026 पर्यंत असणार ाहे.. पितृपक्षात विधीनुसार श्राद्ध विधी केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. तसेच कुटुंबात शांतता आणि आनंद टिकून राहतो. असं असताना या कालावधीत काही नियमही पाळणं गरजेचं आहे. या काळात शुभ कार्य, मांसाहार आणि नवीन गोष्टी घेण्याचा मोह टाळण्यास सांगितलं गेल आहे. तसेच केस आणि नखं कापण्यापासून नियम सांगितले गेले आहेत.

पितृपक्षात काय करू नये?


पितृपक्षात शास्त्रानुसार शुभ कार्य करण्यास मनाई केली गेली आहे. या काळात विवाह, साखरपुडा, मुंडन, गृहप्रवेश आणि नवीन कामं करणं अशुभ मानलं गेलं आहे. तसेच, तामसिक पदार्थ खाण्यास टाळावं. जसं कीस लसूण, कांदा, मांस, अंडी आणि मद्य याचं सेवन करू नये. तसेच मसूर, उडद डाळ आणि चणे खाणं वर्ज्य करावं. या कालावधीत नखं आणि केस कापू नये. घरात वाद होईल असं गोष्टी करू नका. वृद्ध व्यक्तीचा, महिलेचा किंवा गरजूचा अपमान करणं टाळा. पितृपक्षात सूर्यास्तानंतर किंवा संध्याकाळी घर झाडण्यास मनाई आहे. तसेच पितृपक्षाच्या पूजेसाठी किंवा तर्पणासाठी लोखंडी भांड्याचा वापर निषिद्ध मानला गेला आहे.




पितृपक्षात काय करावं?


पितृपक्षात पूर्वजांचा आशीर्वाद मिळावा यासाठी दक्षिणेला तोंड करून कुशा आणि काळे तीळ मिश्रीत जल अर्पित करावं. तसेच पाचबली भोग म्हणजेच अन्न शिजवल्यानंतर त्यातील काही भाग गाय, कावळा, कुत्रा, देव आणि मुंग्यांना द्यावा. आपल्या आर्थिक स्थितीनुसार, गरजू, गरीबांना अन्न, जेवण किंवा वस्त्र दान करावं. या पंधरवड्यात सात्विक आहार आणि ब्रह्मचर्चाचं पालण ठेवावं

(Disclaimer: या बातमीतील माहिती धार्मिक श्रद्धा आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. प्रहार डॉट इन त्याचे समर्थन करत नाही.)
Comments
Add Comment

Goregaon Mulund Link Road केव्हापासून मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल होणार? समोर आली तारीख...

मुंबई: गोरेगाव आणि मुलुंडवाकरांसाठी आनंदाची बातमी म्हणता येईल. गोरेगाव - मुलुंड लिंक रोड (GMLR)प्रकल्पाचा गोरेगाव

विंडीज ओपनर्सचा भारतीय भूमीवर 22 वर्षांनंतर मोठा धमाका; कॅम्पबेल आणि ग्रीव्ह्सने रचला इतिहास!

भारत वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना

Maharashtra Government : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी सरकारचा मोठा निर्णय! 265 तालुक्यांत मदत, उर्वरित तालुक्यांचीही पाहणी

नागपूर : अपुऱ्या पावसामुळे महाराष्ट्रातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या तालुक्यांमध्ये

E Commerce News : ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, जिओमार्ट अडचणीत! नोंदणी नसलेल्या कृषी रसायनाच्या विक्रीप्रकरणी ₹25 लाखांचा दंड

मुंबई : ऑनलाइन खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA)

मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, "विरोधी पक्षांची मानसिकता अति डावी, त्यांचा मेंदूच चोरीला गेलाय"

मुंबई : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विरोधकांकडून सातत्याने उपस्थित केले जात असलेल्या ईव्हीएम (EVM) आणि

Pune News: "वय केवळ आकडा..." पुण्यामध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत आजींचा भन्नाट डान्स; पाहा Video

पुणे: नुकतंच आपण सर्वांनी गणरायाला जड अंत:करणाने भावपूर्ण निरोप दिला. अनेक ठिकाणी गणरायाच्या विसर्जनासाठी