Sunday, September 27, 2026

WhatsApp Features : व्हॉट्सॲप लोकेशनमुळे कॅब बुकिंग होणार झटपट! जाणून घ्या ही सोपी ट्रिक

WhatsApp Features : व्हॉट्सॲप लोकेशनमुळे कॅब बुकिंग होणार झटपट! जाणून घ्या ही सोपी ट्रिक

मुंबई : WhatsAppवर एखाद्याने Location पाठवल्यानंतर त्याच ठिकाणी कॅब बुक करायची असेल, तर अनेकजण पुन्हा संपूर्ण पत्ता Uber किंवा Olaमध्ये टाइप करतात. मात्र, पत्ता टाइप करण्याची गरज नाही. WhatsAppवर आलेली Location थेट कॅब अॅपमध्ये वापरता येते. (WhatsApp Features)

WhatsApp चॅटमध्ये आलेल्या Locationवर टॅप केल्यानंतर ती साधारणपणे Google Mapsमध्ये उघडते. Google Mapsमध्ये त्या ठिकाणचा Plus Code दिसतो. हा त्या ठराविक ठिकाणाशी जोडलेला अक्षरे आणि आकड्यांचा छोटा कोड असतो.

हा Plus Code कॉपी करून Uber अॅप उघडा आणि ‘Where to?’ या पर्यायामध्ये तो Paste करा. त्यानंतर Mapsवर त्या ठिकाणाचा Pin दिसेल. कॅब बुक करण्यापूर्वी Pin योग्य ठिकाणी आहे की नाही, हे एकदा तपासणे महत्त्वाचे आहे. (WhatsApp Features)

ही पद्धत विशेषतः अशा ठिकाणी उपयोगी ठरते, जिथे पत्ता स्पष्ट नसतो किंवा एकाच नावाची अनेक ठिकाणे जवळपास असतात.

Uberकडून काही शहरांमध्ये WhatsAppच्या माध्यमातूनच कॅब बुक करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. Uberच्या अधिकृत WhatsApp नंबरवर चॅट करून Pickup आणि Drop Location शेअर करता येते. याच माध्यमातून भाड्याचा अंदाज आणि ड्रायव्हर संबंधीची माहितीही मिळू शकते. (WhatsApp Features)

Olaमध्येही अशीच ट्रिक

Olaमध्ये सध्या WhatsApp Location थेट Import करण्याचा स्वतंत्र पर्याय नसला, तरी Plus Codeचा वापर करता येतो. WhatsAppवर आलेली Location Google Mapsमध्ये उघडा, Plus Code कॉपी करा आणि Ola अॅपच्या Search Boxमध्ये Paste करा.

कॅब बुक करण्यापूर्वी नकाशावरील Pin नक्की तपासा. विशेषतः मोठ्या इमारती, ऑफिस कॉम्प्लेक्स, सोसायट्या किंवा एकापेक्षा जास्त प्रवेशद्वार असलेल्या ठिकाणी Pickup Point चुकीचा निवडला जाऊ शकतो. (WhatsApp Features)

WhatsAppवर आलेल्या Locationचा अशा प्रकारे वापर केल्यास पत्ता शोधण्यासाठी लागणारा वेळ वाचतो आणि काही सेकंदांत योग्य ठिकाणी कॅब बुक करता येते. (WhatsApp Features)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >