मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रवाशांच्या तिकिटांची सत्यता आणि वैधता तपासण्यासाठी मध्य रेल्वेवर दिनांक 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत एक विशेष आणि सखोल तिकीट तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेदरम्यान स्थानकांवर तसेच रेल्वे प्रवासादरम्यान तिकिटांची कडक तपासणी केली जाईल.(Central Railway)
ठाण्यातील कोपरी (Kopri, Thane) परिसरात रविवारी रात्री एका विचित्र आणि थरारक घटनेमुळे एकच खळबळ उडाली. स्वतःला स्थानिक गुंड म्हणवून घेणाऱ्या ‘युट्युब भाई’ (YouTube ...
मोहिमेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि नियम:
- ओळखपत्र अनिवार्य: एकाच तिकिटावर अनेक प्रवाशांचे आरक्षण असल्यास, त्या तिकिटावरील किमान एका प्रवाशाकडे विहित (नोंदवलेले) मूळ ओळखपत्र असणे बंधनकारक असेल. आवश्यक मूळ पुरावा न दाखवल्यास, नियमांनुसार त्या तिकिटावरील सर्व प्रवाशांना विनातिकीट प्रवास करणारे मानले जाईल.
- सवलती आणि आरक्षण कोटा: सवलतीच्या दरातील तिकिटे, विशिष्ट आरक्षण कोटा आणि विविध पासद्वारे आरक्षित केलेल्या तिकिटांवर या मोहिमेत विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. या कोट्यांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे त्यांची पात्रता सिद्ध करणारी मूळ कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- ई-पास/पीटीओ प्रवाशांसाठी नियम: ई-पास किंवा पीटीओ (PTO) वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मूळ ओळखपत्र बाळगणे सक्तीचे असेल. तसेच प्रवासापूर्वी ई-पासच्या बदल्यात अधिकृत तिकीट किंवा पास मिळवल्याची खात्री करावी लागेल.
- 'टीटीइ ॲप'चा वापर: अनारक्षित तिकिटांची सत्यता पडताळण्यासाठी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांकडून 'टीटीइ ॲप'चा वापर करून प्रमाणीकरण केले जाईल.
मोहिमेचा उद्देश
आरक्षण सुविधांचा गैरवापर रोखणे, सवलती आणि पासचा फसवणुकीने होणारा गैरवापर थांबवणे आणि रेल्वेच्या महसुलातील गळती रोखणे हा या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी नेहमी वैध तिकिटांसह, लागू असल्यास विहित मूळ ओळखपत्र आणि पात्रता कागदपत्रे सोबत बाळगून प्रवास करावा आणि या तपासणी मोहिमेदरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांना पूर्ण सहकार्य करावे.(Central Railway)






