Central Railway : मध्य रेल्वेवर 1 ते 31 ऑक्टोबर दरम्यान सखोल तिकीट तपासणी मोहीम; एक तिकीट, एक मूळ ओळखपत्र अनिवार्य

मध्य रेल्वेवर 1 ते 31 ऑक्टोबरदरम्यान सखोल तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. या काळात रेल्वे प्रवाशांच्या तिकिटांची आणि ओळखपत्रांची कडक तपासणी केली जाणार आहे.

मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रवाशांच्या तिकिटांची सत्यता आणि वैधता तपासण्यासाठी मध्य रेल्वेवर दिनांक 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत एक विशेष आणि सखोल तिकीट तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेदरम्यान स्थानकांवर तसेच रेल्वे प्रवासादरम्यान तिकिटांची कडक तपासणी केली जाईल.(Central Railway)






मोहिमेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि नियम:



  • ओळखपत्र अनिवार्य: एकाच तिकिटावर अनेक प्रवाशांचे आरक्षण असल्यास, त्या तिकिटावरील किमान एका प्रवाशाकडे विहित (नोंदवलेले) मूळ ओळखपत्र असणे बंधनकारक असेल. आवश्यक मूळ पुरावा न दाखवल्यास, नियमांनुसार त्या तिकिटावरील सर्व प्रवाशांना विनातिकीट प्रवास करणारे मानले जाईल.

  • सवलती आणि आरक्षण कोटा: सवलतीच्या दरातील तिकिटे, विशिष्ट आरक्षण कोटा आणि विविध पासद्वारे आरक्षित केलेल्या तिकिटांवर या मोहिमेत विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. या कोट्यांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे त्यांची पात्रता सिद्ध करणारी मूळ कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • ई-पास/पीटीओ प्रवाशांसाठी नियम: ई-पास किंवा पीटीओ (PTO) वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मूळ ओळखपत्र बाळगणे सक्तीचे असेल. तसेच प्रवासापूर्वी ई-पासच्या बदल्यात अधिकृत तिकीट किंवा पास मिळवल्याची खात्री करावी लागेल.

  • 'टीटीइ ॲप'चा वापर: अनारक्षित तिकिटांची सत्यता पडताळण्यासाठी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांकडून 'टीटीइ ॲप'चा वापर करून प्रमाणीकरण केले जाईल.


मोहिमेचा उद्देश


आरक्षण सुविधांचा गैरवापर रोखणे, सवलती आणि पासचा फसवणुकीने होणारा गैरवापर थांबवणे आणि रेल्वेच्या महसुलातील गळती रोखणे हा या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी नेहमी वैध तिकिटांसह, लागू असल्यास विहित मूळ ओळखपत्र आणि पात्रता कागदपत्रे सोबत बाळगून प्रवास करावा आणि या तपासणी मोहिमेदरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांना पूर्ण सहकार्य करावे.(Central Railway)

Comments
Add Comment

रावणाचे उदात्तीकरण आणि प्रभू श्रीरामांचा अपमान खपवून घेणार नाही, हिंदु जनजागृती समिती आक्रमक

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'रामायण' चित्रपटात मूळ कथेचा विपर्यास करून रावणाचे उदात्तीकरण आणि प्रभू श्रीराम,

Central Railway : नेव्ही हाफ मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या 2 विशेष लोकल; कल्याण आणि पनवेलहून मध्यरात्री सुटणार

मुंबई : ‘डब्ल्यूएनसी नेव्ही हाफ मॅरेथॉन-2026’ मध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने 2 विशेष

Western Railway Mega Block : रविवारी पश्चिम रेल्वेचा ५ तासांचा जम्बो ब्लॉक; चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान रेल्वे वाहतुकीत बदल

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे.

Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट; फरार अभिषेक पंडितविरोधात 'लूकआऊट' जारी, पत्नीला अटक

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास आता अधिक

Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; फरार अभिषेक पंडितविरोधात लुकआऊट नोटीस

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफच्या गोळीबार प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचने महत्त्वाची कारवाई केली आहे. या प्रकरणातील

Samantha Ruth Prabhu news : समंथा प्रभू आणि राज निदिमोरू यांच्या घरी चिमुकल्या 'देव'चे आगमन; पहिला फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Prabhu) आणि चित्रपट निर्माते राज निदिमोरू (Raj Nidimoru) यांच्या संसारात एका