मुंबई: अन्न- औषध प्रशासनाने गेल्या आठवड्याभरात महाराष्ट्रातील 30 ठिकाणच्या हॉटेल आणि आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. शिवाय, 26 आस्थापनांची तपासणी करत लाखो रूपयांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमध्ये एफडीएकडून 22 जणांवर गुन्हा दाखल करत 30 जणांना अटक केली आहे. एफडीएच्या ह्या धडक कारवाईमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील दुकानदारांचे आणि हॉटेल चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर एफडीएने केलेल्या कारवाईमध्ये हजारो किलोंचा साठा जप्त करत करोडो रूपयांचा मुद्दे माल जप्त केला आहे.
मुंबई: राज्याच्या आर्थिक व्यवस्थेत आवश्यक बदल घडवून आणण्यासाठी सहा महिन्यांत सुधारणा आणि कृतीचा आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र ...
23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2026 दरम्यान सणासुदीच्या निमित्ताने अन्न- औषध प्रशासनाने धडक कारवाईमध्ये विविध जिल्ह्यांत मिठाई, दूध- दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, तांदूळ, ड्रायफ्रूट्स, नमकीन, फरसाण, चहा, मसाले, सॉस, नूडल्स, वेफर्स आणि इतर अन्नपदार्थांचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त केला आहे. हा एकूण जप्त केलेला साठा 50,601.78 किलोंचा असून याची किंमत तब्बल 1 कोटी 19 लाख इतकी आहे. मुंबई 13, कोकण विभाग 6, पुणे 8 आणि छत्रपती संभाजीनगर 3 अशा महाराष्ट्रातील 30 ठिकाणच्या हॉटेल- रेस्टॉरंट्सचे एफडीएकडून अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहे.
- ‘शैक्षणिक सहाय्य, संरक्षण आणि सक्षमीकरण धोरण-२०२६’साठी समितीचा अहवाल सादर मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना ...
यामध्ये मुंबईतील काळबादेवी, धारावी, कुलाबा, परळ, लोअर परळ, फोर्ट, बांद्रा पश्चिम, सांताक्रुझ पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम, खार पश्चिम, विलेपार्ले आणि चेंबूर या परिसरातील हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये धडक कारवाई केलेली आहे. तर, कोकण विभागामध्ये ठाणे आणि नवी मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये स्वच्छता आणि आरोग्य विषयक निकषांचे पालन न केल्यामुळे एफडीएकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही धडक कारवाई करत जिल्ह्यातील दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून एफडीएकडून स्वच्छतेसंबंधित कारवाई सुरू असतानाही अनेक ठिकाणी नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळण्याचा प्रकार सुरू होता.
Jalgaon Accident: अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयाजवळील रेल्वे उड्डाणपुलावर दुचाकीचा भीषण अपघात होऊन एका ज्योतिषाचा मृत्यू झाला. दुचाकी उड्डाणपुलाच्या ...
या प्रकरणी नवी मुंबई आणि रायगड परिसरातील अनेक हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि आस्थापनांमधील वस्तूंचे नमुने प्रयोगशाळेमध्ये विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. कमी दर्जाचे पदार्थ, मिसब्रँडिंगचे पदार्थ आणि प्रोडक्टवर लेबल नसल्यामुळे यासह अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे वस्तुंचे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवले आहेत. मुंबई, ठाणे आणि पुणेसह संपूर्ण राज्यातील आस्थापनांवर आणि हॉटेल- रेस्टॉरंटवर एफडीएकडून कारवाई करण्यात आली आहे. एफडीएकडून कारवाई केलेल्या पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले असून रिपोर्ट आल्यानंतर अनेक दुकानदारांवर पुढची कारवाई करण्यात येणार आहे.




