मुंबई: आयकर विभागाच्या मुंबई शाखेने अभिनेत्री रकुल प्रीत सिंग सोबत तिचे सासरे आणि निर्माते वाशु भगनानी यांच्या संबंधित 12 ठिकाणी छापे टाकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, टॅक्स चोरी आणि आर्थिक नियमितता झाल्याच्या संशयामुळे सोमवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. शिवाय, चित्रपटाच्या नावाखाली परदेशात पैसे पाठवल्याच्या संशयामुळे अनेक सेलिब्रिटींना आणि प्रॉडक्शन हाऊसला मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. आयकर विभागाकडून रकुल आणि तिच्या सासऱ्यांसंबंधित सर्व ठिकाणांवर एकत्र छापा टाकण्याची मोहिम राबवली. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र छापेमारी टाकल्यामुळे भगनानी कुटुंबीय गोत्यात सापडले आहेत.
मुंबई: अभिनेता रणबीर कपूर सध्या 'रामायण' आणि 'लव्ह अँड वॉर' या अपकमिंग चित्रपटामुळे चांगलाच प्रकाशझोतात आहे. सध्या त्याची सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये ...
टीव्ही 9 च्या वृत्तानुसार, सोमवार, 28 सप्टेंबर रोजी, आयकर विभागाने रकुल प्रीत सिंग आणि वासू भगनानी यांच्याशी संबंधित 12 ठिकाणी एकाच वेळी धाड टाकली आहे. ही कारवाई नेमकी किती वेळ चालेल? हे सांगणं अशक्य आहे. मुंबई आयकर विभागाच्या पथकाकडून परदेशी व्यवहारांसंबंधीची कागदपत्रे, आर्थिक नोंदी आणि तपशिलांची चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपट शुटिंग, परदेशी वितरण आणि निर्मितीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैसे परदेशात पाठवले जात असल्याची माहिती आयकर विभागाला गेल्या काही दिवसांपासून अशी माहिती मिळत होती. आयकर विभागाला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये टॅक्स चोरी आणि आर्थिक नियमितता झाल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.
Mumbai: The Income Tax Department launched search operations at multiple locations in Mumbai linked to actress Rakul Preet Singh, filmmaker Vashu Bhagnani and Panorama Studios. Around 12 premises are reportedly being searched by teams from the Mumbai Income Tax Department as part… pic.twitter.com/qtvPgAsF4d
— NextMinute News (@nextminutenews7) September 28, 2026
तपास यंत्रणेकडून मुंबईतील वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर आयकर विभागाकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिने प्रसिद्ध निर्माते वासू भगनानी यांचा मुलगा जॅकी भगनानीसोबत 2024 मध्ये लग्नगाठ बांधली आहे. या प्रकरणामध्ये रकुल प्रीत सोबत तिचे सासरे वासू भगनानी यांचेही नाव समोर आले आहे. वासू भगनानी यांच्या मालकीची 'पूजा एंटरटेनमेंट' हे प्रॉडक्शन हाऊस आहे. या कंपनीने अनेक बॉलिवूड चित्रपटांची निर्मिती केली आहे. इतकंच नाही, तर 'दृश्यम' या लोकप्रिय फ्रँचायझी चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या पॅनोरमा स्टुडिओशी संबंधित ठिकाणीही आयकर विभाग शोधमोहीम राबवत असल्याचं वृत्त आहे.
मुंबई : बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आता छोट्या पडद्यावर एका अगदी नव्या आणि रंजक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. ...






