नेमका कसा पाहिला सामना?
अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनी भारत वेस्ट इंडिज सामना पाहण्यासाठी युट्यूबवर मार्ग शोधला. त्यांनी युट्यूबवर जाऊन सामन्याचं लाईव्ह समालोचन ऐकलं आणि सामन्याचा आनंद लुटला. यावेळी त्या समालोचनावर प्ले होत असलेलं ग्राफिक्स पाहून त्यांनाही हसू आवरलं नाही. त्यांच्या दोघांतील चर्चाही या निमित्ताने सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. संपूर्ण प्रकार इशान किशने आपल्या मोबाईल फोनमध्ये चित्रित केला आणि इन्स्टाग्राम स्टोरीत पोस्ट केला आहे. व्हिडीओत दोघेही प्रसिद्ध कृष्णाच्या बॉलिंग एक्शनवर चर्चा करताना दिसले.
Ishan Kishan and Abhishek Sharma enjoying IND vs WI match. 🤣😭 pic.twitter.com/b39Pj9e7ZH
— Aarya 🕊️ (@Vitamin_Vk18) September 27, 2026
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने विजय मिळवला. भारताने 8 गडी राखून वेस्ट इंडिजला मात दिली. या ...
भारत वेस्ट इंडिज सामना
भारताने वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजला पराभूत केलं आणि 1-0 ने आघाडी घेतली. वेस्ट इंडिजने 295 धावा केल्या आणि विजयासाठी 296 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भारताने फक्त 2 गडी गमवून 41.4 षटकात पूर्ण केलं. या सामन्यात रोहित शर्माने 32, शुभमन गिलने 110, विराट कोहलीने नाबाद 139 आणि ऋतुराज गायकवाडने नाबाद 13 धावांची खेळी केली.