वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने विजय मिळवला. भारताने 8 गडी राखून वेस्ट इंडिजला मात दिली. या सामन्यात कर्णधार शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी झंझावाती शतकं ठोकली. तर रोहित शर्मा 35 चेंडूत 32 धावा करून बाद झाला. खरं तर पाटा विकेटवर रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. कारण चेंडू आरामात बॅटवर येत होता, असं क्रिकेट जाणकारांचं म्हणणं आहे. पण काहीही असलं तरी भारताने हा सामना सहज जिंकला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. मात्र या सामन्यानंतर रोहित शर्मासोबत एक घटना घडली. बसमधून उतरत असताना त्याचा पाय घसरला आणि पडला. रोहित शर्मा घसरून पडल्याने विराट कोहलीही टेन्शनमध्ये आला. रोहित शर्मासोबत हा प्रकार तिरुवनंतपुरम वनडे सामन्यानंतर हॉटेलमध्ये जात असताना घडला.
रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल..
रोहित शर्मा बसमधून घसरून पडला आणि व्हिडीओ व्हायरल होणार नाही, असं होऊच शकत नाही. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.या व्हिडीओत रोहित शर्मा बसमधून उतरताना घसरून पडल्याचं स्पष्ट दिसत आहे. टीम बस हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर बसमधून उतरताना हा प्रकार घडला. रोहित शर्मा बसच्या पायऱ्यांवरून उतरत असताना घसरला. त्यामुळे तो पडल्याचं पाहून सुरक्षाकर्मी आणि इतर सहकाऱ्यांनी धाव घेतली. रोहित शर्मा पडल्याने त्याला दुखापत झाली की नाही ते अद्याप अस्पष्ट आहे. पण विराट कोहलीच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टपणे दिसली. कारण हा प्रकार घडल्यानंतर विराट कोहली चिंतेत दिसला.
Rohit Sharma 𝗦𝗹𝗶𝗽𝗽𝗲𝗱 from the Bus 😱
While returning to the hotel after winning the first ODI against the West Indies, Rohit Sharma slipped badly on the stairs of the team bus. 😥
- Everyone was celebrating India's win, but Virat Kohli was 𝘀𝘁𝘂𝗻𝗻𝗲𝗱 to see Rohit. 😭 pic.twitter.com/T01Lf4tJsb
— Mukku (@Cric_Mukku) September 28, 2026
Asian Games 2026: भारतीय क्रिकेट संघ आशियाई क्रिडा स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहचली आहे. रविवारी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणारा उपांत्यपूर्व फेरीचा सामना ...
भारत वेस्ट इंडिज दुसरा वनडे सामना
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा सामना 30 सप्टेंबर 2026 रोजी गुवाहाटीत होणार आहे. या सामन्यात रोहित शर्माकडून फार अपेक्षा आहेत. कारण वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळायचं तर चांगला खेळ दाखवणं गरजेचं आहे. दुसरीकडे, विराट कोहलीने आपला फॉर्म काय आहे ते दाखवून दिलं आहे. आता तशाच कामगिरीची अपेक्षा रोहित शर्माकडून आहे. रोहित शर्माने पहिल्या वनडे सामन्यात 32 धावांचं योगदान दिलं. त्याने 3 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने या धावा केल्या. तर कर्णधार शुबमन गिलसोबत पहिल्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली.