Sunday, September 27, 2026

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे आज दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे आज दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर

मुंबई : दुष्काळामुळे तलावांमधील मत्स्यव्यवसायावर झालेला परिणाम आणि नुकसानग्रस्त मच्छीमारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे आज, सोमवारी (२८ सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राणे विविध तलावांची प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक मच्छीमारांशी संवाद साधणार असून, त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत.

मंत्री राणे सकाळी १० वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील शिवणटाकळी तलावाची पाहणी करतील. यावेळी स्थानिक मच्छीमारांशी संवाद साधून दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अडचणी तसेच मत्स्यव्यवसायाचे झालेले नुकसान याची माहिती ते जाणून घेणार आहेत. यानंतर ते जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील राजेवाडी तलावाला दुपारी १२.३० वाजता भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी १.१५ वाजता सोमाठणा तलावाची पाहणी केली जाणार आहे. या दोन्ही ठिकाणी स्थानिक मच्छीमारांशी चर्चा करून तलावांमधील पाणीसाठ्याची स्थिती आणि त्याचा मत्स्यव्यवसायावर झालेला परिणाम जाणून घेतला जाणार आहे.

दौऱ्याच्या अखेरीस दुपारी ३.३० वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत दुष्काळसदृश परिस्थितीमुळे मत्स्यव्यवसायावर झालेला परिणाम, तलावांची सद्यस्थिती आणि नुकसानग्रस्त मच्छीमारांच्या विविध प्रश्नांचा आढावा घेतला जाणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >