- ‘शैक्षणिक सहाय्य, संरक्षण आणि सक्षमीकरण धोरण-२०२६’साठी समितीचा अहवाल सादर
मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक अडचणी लक्षात घेऊन त्यांच्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याच्या दिशेने राज्य सरकारने पुढचे पाऊल टाकले आहे. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य, विविध सुविधा आणि संरक्षण देण्याच्या उद्देशाने प्रस्तावित ‘शैक्षणिक सहाय्य, संरक्षण आणि सक्षमीकरण धोरण-२०२६’साठी गठित करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला आहे. या अहवालाच्या आधारे धोरणाच्या पुढील कार्यवाहीला दिशा मिळणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली. (Single Mother Education Policy)
एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. महाविद्यालयीन प्राचार्य, कायदे तज्ज्ञ आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा समितीत समावेश होता. समितीने केलेल्या अभ्यासाच्या आधारे तयार करण्यात आलेला अहवाल उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आणि सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे यांच्याकडे सादर करण्यात आला.
prahaar.in/2026/09/28/maharashtra-politics-news-sunil-tatkare-reaction-to-sharad-pawar-statement-regarding-the-ncp-merger/
मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत समितीच्या अहवालावर सविस्तर चर्चा करण्यात आली. एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या काळात कोणत्या प्रकारचे शैक्षणिक सहाय्य, सुविधा आणि संरक्षण उपलब्ध करून देता येईल, याबाबत बैठकीत विचारविनिमय झाला. प्रस्तावित धोरणाचा लाभ देताना संबंधित विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीची संमती घेण्याच्या मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली.(Single Mother Education Policy)
एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना आर्थिक अडचणींबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक अडथळ्यांना सामोरे जावे लागू नये, हा प्रस्तावित धोरणाचा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या परिस्थिती आणि गरजा लक्षात घेऊन त्यांना आवश्यक सहाय्य व संरक्षण उपलब्ध करून देत उच्च शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यामुळे प्रस्तावित धोरणाच्या पुढील कार्यवाहीसाठी महत्त्वाचा आधार उपलब्ध झाला असल्याचेही पाटील यांनी नमूद केले.(Single Mother Education Policy)
मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता मोठा बदल होणार आहे. सन 2037 पर्यंत एसटीचा 100% ताफा इलेक्ट्रिक करण्याचे ...
बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, अमोल मुत्याल आणि प्रताप लुबाळ, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे, एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्यासह समितीचे सदस्य आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.(Single Mother Education Policy)