सोमवार की रविवार? आठवड्याच्या कोणत्या दिवशी चालतो विराट कोहलीचा सर्वाधिक धुमाकूळ? वाचा आकडेवारी

विराट कोहली आणि शतक आता हे समीकरण आता काही नवीन नाही. विराट कोहलीला उगीचच रनमशिन्स संबोधलं जात नाही. असं असताना त्याच्यासाठी कोणता वार लकी ठरतो? याबाबत तुम्हाला सांगितलं तर आश्चर्याचा धक्का बसेल. चला जाणून घेऊयात..

विराट कोहली हे क्रिकेटविश्वातील खूप मोठं नाव आहे. भारतीय क्रिकेटविश्वात सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक नावलौकिक मिळवलेला खेळाडू आहे. विराट कोहलीने टी20 आणि कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र वनडे फॉर्मेटमध्ये त्याचा झंझावात सुरूच आहे. त्याचा आक्रमक बाणा आजही तसाच आहे. मैदानात उतरला की आपल्या शैलीत गोलंदाजांना सळो की पळो करून सोडतो. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात विराट कोहलीने झंझावाती शतक ठोकलं. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 86वं शतक होतं. या शतकी खेळीसह त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहे. त्याने आतापर्यंत ठोकलेल्या 86 शतकांपैकी 60 शतकं संघाला विजय मिळवून देणारी आहे. हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठा विक्रम असून त्याच्या आसपासही कोणी नाही. दुसरीकडे, विराट कोहलीच्या शतकांबाबत एक आश्चर्यकारक आकडा समोर आला आहे. यात आठवड्याच्या कोणत्या दिवशी त्याने सर्वाधिक शतकं ठोकली याबाबत सांगितलं गेलं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीसाठी रविवार हा खास ठरला आहे. त्याने रविवारी एकूण 27 शतकं ठोकली आहे. आठवड्यातील इतर वारांच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे. त्यानंतर गुरूवार हा त्याच्यासाठी बेस्ट वार ठरला आहे. या दिवशी विराट कोहलीने 15 शतकं ठोकली आहेत. तर बुधवारी 12 आणि शनिवारी 11 शतकं नावावर केली आहेत. शुक्रवारी विराट कोहलीने 9 शतकं, मंगळवारी 7 शतकं ठोकली आहेत. सोमवार हा विराट कोहलीसाठी आकडेवारीनुसार काही खास नाही. त्याने या दिवशी एकूण 5 आंतरराष्ट्रीय शतकं ठोकली आहेत.






सोमवार असो की मंगळवार, विराट कोहलीने आठवड्याच्या प्रत्येक वाराला शतक ठोकलं आहे. विराट कोहली शतकांच्या शतकापासून अजून 14 शतकं दूर आहे. आता येणाऱ्या काही मालिकांमध्ये लवकरच 90 शतकं पूर्ण करेल असं दिसत आहे. जर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली नसती तर हा आकडा अधिक असता. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकांचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. वनडे वर्ल्डकप 2027 पर्यंत विराट कोहली किती शतकं ठोकतो, याकडे आता क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
Comments
Add Comment

India vs Pakistan U19 Asia Cup Final 2026: भारत पाकिस्तान महामुकाबला, कधी आणि कुठे पाहता येणार सामना?

एसीसी अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हायव्होल्टेज सामना पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे.

Ahilyanagar Kho-Kho Championship: ४० वर्षांनंतर नगरमध्ये रंगणार राज्य खो-खो स्पर्धेचा थरार; २८ नोव्हेंबरपासून ४८ संघांमध्ये चुरस!

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : तब्बल चार दशकांनंतर अहिल्यानगर शहराला पुन्हा एकदा पुरुष व महिला गटातील राज्यस्तरीय

विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या नकोशा विक्रमाची केली बरोबरी, न्यूझीलंडविरुद्धच्या चार सामन्यात नको ते घडलं

[caption id="attachment_1074904" align="aligncenter" width="800"] न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले.

भारताच्या 244 धावांनी पराभवानंतर गौतम गंभीर संतापला; कोहली, रोहित आणि अय्यरच्या फलंदाजीवर टीका

नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा अवघ्या 89 धावांत डाव आटोपला आणि तब्बल 244

IND vs NZ 4th ODI: भारताने 244 धावांनी सामना गमावला आणि नकोसे विक्रम केले नावावर, वाचा काय ते

[caption id="attachment_1074798" align="aligncenter" width="800"] न्यूझीलंडचा एकदिवसीय इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय आहे. या सामन्यात न्यूझीलंडने

IND vs NZ 4th ODI: भारताचा मानहानीकारक पराभव, नेमकं काय चुकलं? कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला...

न्यूझीलंडने चौथ्या वनडे सामन्यात कमबॅक केलं आणि भारताला 244 धावांनी पराभूत केलं. खरं तर न्यूझीलंडसाठी हा सामना