BMC Rabies Clinic : मुंबईतील प्रत्येक प्रभागात स्वतंत्र रेबीज क्लिनिक स्थापन करणार

महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केला मानस


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प अंतर्गत दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या शुभ हस्ते सोमवारी २८ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आला. मुंबईतील प्रत्येक महानगरपालिका प्रभागात पुरेशा आणि विशेष प्रशिक्षित मनुष्यबळासह स्वतंत्र रेबीज क्लिनिक स्थापन करण्याचा मानस महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केला. दरम्यान, मुंबईत हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे रेबीज प्रतिबंधक लस आणि सीरम उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाला दिले. मुंबईतील सर्वात मोठ्या आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून मुंबई रेबीज निर्मूलन मोहिमेला पाठबळ देण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी केले आहे.


जागतिक रेबीज दिनानिमित्त, भायखळा स्थित वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथे झालेल्या या कार्यक्रमात महापौर रितू तावडे यांच्या हस्ते माहितीपत्रकाचे अनावरणही करण्यात आले.


मुंबईत रेबीज निर्मूलन मोहीम अंतर्गत पशुवैद्यकीय आरोग्य खात्याने घेतलेल्या विशेष प्रयत्नांचे महापौर रितू तावडे यांनी कौतुक केले. तसेच, वर्ष २०२५ मध्ये रेबीजमुळे मुंबईत एकही मृत्यूची नोंद न झाल्याच्या कामगिरीबद्दल विभागाचे त्यांनी अभिनंदन केले.



अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा- लवंगारे, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्‍या राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमाचे सहसंचालक डॉ. अजित शेवाळे, उपायुक्‍त (विशेष) विनायक विसपुते, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहअधिष्ठाता डॉ. शैलेश इंगोले, डब्ल्यू. व्ही. एस. युके मिशन रेबीजचे संचालक डॉ. अँडी गिब्सन, महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख डॉ. कलिमपाशा पठाण, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी आदी मान्यवर उपस्थित होते.


महापौर रितू तावडे म्हणाल्या की, वर्ष २०२५ मध्ये मुंबईत रेबीजमुळे एकही मृत्यू न होणे हे ऐतिहासिक यश आहे. वर्ष २०२७ पर्यंत मुंबईला रेबीज नियंत्रण क्षेत्र बनवणे आणि २०३० पर्यंत 'शून्य मृत्यू'चे ध्येय गाठणे, हे उद्दिष्ट आहे. मुंबईतील प्रत्येक महानगरपालिका प्रभागामध्ये पुरेशा आणि विशेष प्रशिक्षित मनुष्यबळासह स्वतंत्र रेबीज क्लिनिक स्थापन करण्याचा मानस महापौर श्रीमती तावडे यांनी व्यक्त केला. प्रत्येक प्रभागनिहाय क्लिनिक अंतर्गत रेबीज प्रतिबंधासाठी आवश्यक असणाऱ्या आधुनिक लसीकरणाची अखंड सेवा २४ तास उपलब्ध राहील, याचीही खबरदारी घ्यावी. त्यामुळे कोणत्याही दुर्दैवी घटनेत श्वानदंशाची घटना घडल्यास तत्काळ आणि सर्वोत्तम उपचार याठिकाणी मिळतील. मुंबईतील प्रत्येक प्रभागांमध्ये श्वान पकडणारे स्वतंत्र आणि समर्पित वाहन हे अद्ययावत पशुवैद्यकीय उपचार सुविधेसह उपलब्ध करून देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.


राष्ट्रीय रोग नियंत्रण, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसंचालक डॉ. अजित शेवाळे म्हणाले की, देशभरातील महत्त्वाच्या शहरात रेबीज निर्मूलन मोहीम अंतर्गत, मुंबईने मागील काही वर्षांत अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. रेबीज निर्मूलन मोहीम अंतर्गत कृती आराखडा तयार करून अंमलात आणण्यात मुंबईची कामगिरी अग्रस्थानी आहे. वर्ष २०३० च्या उद्दिष्टाने अनुषंगाने रेबीज निर्मूलन मोहिमेच्या प्रयत्नांना आवश्यक सर्वतोपरी सहकार्य करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.


अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा - लवंगारे म्हणाल्या की, प्राणी - मनुष्य यांच्यातील कलह शहरासोबतच प्रत्येक घरोघरी पोहचला आहे. रेबीज निर्मूलन मोहीम अंतर्गत समाजातील विविध घटकांना सहभागी करून घेणे महत्वाचे ठरणार आहे. समाजात जनजागृती करून गंभीरपणे कार्यक्रम राबवून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. महानगरपालिका क्षेत्रात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे रेबीज प्रतिबंधक लस आणि सीरम उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाला दिले. मुंबईतील सर्वात मोठ्या आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून मुंबई रेबीज निर्मूलन मोहिमेला पाठबळ देण्याचे आवाहन त्यांनी केले.

Comments
Add Comment

BMC News : आम्ही लोकांची घरे तोडणारे नसून वाचवणारे आहोत

महापाालिका सभागृहात १४ फुटांपर्यंच्या झोपड्यांवरील कारवाईचा तीव्र निषेध आयुक्त उपस्थित न राहिल्याने सभेचे

Mumbai Manhole Accident : सांताक्रुझमध्ये मॅनहोलमध्ये उतरलेल्या सफाई कामगाराचा मृत्यू

दुसरा कामगार आयसीयूमध्ये दाखल मुंबई (विशेष प्रतिनिधी) : साकीनाका येथे मॅनहोलची दुर्घटना घडून अस्लम शेख नावाच्या

Andheri Bridge Repair : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील अंधेरी पूलाच्या दुरुस्तीचा वाढता वाढे खर्च

तब्बल ११४ कोटींवरून १३० कोटींवर पोहोचला खर्च मुंबई (विशेष प्रतिनिधी) एमएमआरडीएकडून ताब्यात आलेल्या पश्चिम

Maharashtra Government : आमदार-खासदारांच्या पत्रांना दोन महिन्यांत उत्तर बंधनकारक - सामान्य प्रशासन विभागाचे निर्देश

सरकारी कार्यालयांत सौजन्याची वागणूक, महिन्यातील पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी दोन तास राखीव मुंबई : आमदार आणि

Rakul Preet Singh News: रकुल प्रीत सिंग, निर्माता वासू भगनानीशी संबंधित 12 ठिकाणी IT चे छापे, तपास सुरू; नेमकं प्रकरण काय?

मुंबई: आयकर विभागाच्या मुंबई शाखेने अभिनेत्री रकुल प्रीत सिंग सोबत तिचे सासरे आणि निर्माते वाशु भगनानी यांच्या

Central Railway : मध्य रेल्वेवर 1 ते 31 ऑक्टोबर दरम्यान सखोल तिकीट तपासणी मोहीम; एक तिकीट, एक मूळ ओळखपत्र अनिवार्य

मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रवाशांच्या